शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ॲप बनवणार करोडपती! २०० रुपयांच्या खर्चावर १ कोटींचा फायदा, मोदी सरकारची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 18:27 IST

'मेरा बील मेरा अधिकार' या योजने अंतर्गत तुम्ही लखपती होऊ शकता.

तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक अॅप इस्टॉल करुन लखपती होऊ शकता. हे सरकारी अॅप आहे, यावरुन तुम्हाला फक्त तुम्ही व्यवहार केलेल्या बिलाचा फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही 'मेरा बील, मेरा अधिकार' या अॅप बद्दल ऐकलं असेल. Google Play Store वर 'मेरा बिल मेरा अधिकार' हे अॅप सर्च करुन तुमच्या मोबाइलवर डाऊनलोड करा. मोदी सरकारची ही नवीन योजना आहे, यामध्ये तुम्ही २०० रुपयांच्या GST बिलासह १ कोटी रुपये जिंकू शकता. 

तुम्‍ही 'मेरा बिल मेरा अधिकार' लकी ड्रॉचे विजेते झाल्‍यास, तुम्‍हाला ३० दिवसांच्‍या आत अॅपवर पॅन क्रमांक, आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते तपशील द्यावा लागेल. यानंतर, बक्षिसाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

रिलायन्सला पहिल्याच आठवड्यात झटका! ३८,४९५ कोटींचे नुकसान, Airtel, SBI'लाही धक्का

१ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रातील मोदी सरकारने 'मेरा बिल मेरा अधिकार' ही योजना सुरू केली. यामध्ये भारतातील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात. योजनेअंतर्गत अनेक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यामध्ये किमान २०० रुपयांच्या बिलाचा फोटो अपलोड करून जास्तीत जास्त १ कोटी रुपये जिंकता येतील.

ही योजना आसाम, गुजरात, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना एक वर्षासाठी सुमारे १२ महिने सुरू राहणार आहे.

या योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी दोन बंपर बक्षिसे काढली जातील. याची कमाल किंमत एक कोटी रुपये असेल. तसेच १० लाख रुपयांचे मासिक १० लकी ड्रॉ काढले जातील. १०,००० रुपयांचे तेच ८०० मासिक लकी ड्रॉ काढले जाणार आहे.

बील असं अपलोड करा

अगोदर तुम्हाला 'मेरा बिल मेरा अधिकार' अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या बिलाचे इनव्हॉइस अपलोड करावे लागेल.यासाठी तुम्हाला My Invoice या पर्यायावर जावे लागेल, जिथे तुम्हाला कॅमेरा, गॅलरी आणि PDF असे तीन पर्याय मिळतील. तुम्ही बिल इनव्हॉइस फोटो, गॅलरी किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करू शकाल. यानंतर, तुमच्या बिलाचे सर्व तपशील जसे की CGST, SGST आणि इतर व्यवहार तपशील त्यात भरा. यानंतर सबमिट इनव्हॉइस वर क्लिक करावे लागेल. तुम्हाला बदल करायचा असल्यास त्यात बदल करू शकता. यानंतर अपलोड केले जाईल. आणि ARN जनरेट होईल.

यात तपशीलांसह NRN माय इनव्हॉइस विभागात उपलब्ध असेल. बक्षीस जिंकण्यासाठी वापरकर्त्यांना हार्ड कॉपी सुरक्षित ठेवावी लागेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी