शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्ट ऑफीस अ‍ॅप्सचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 08:07 IST

मायक्रोसॉफ्ट ऑफीसच्या अंतर्गत येणार्‍या वर्ड, आऊटलूक आणि पॉवरपॉइंट या अ‍ॅप्सचे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

मायक्रोसॉफ्ट ऑफीसच्या अंतर्गत येणार्‍या वर्ड, आऊटलूक आणि पॉवरपॉइंट या अ‍ॅप्सचे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या एमएस ऑफीसच्या अंतर्गत येणार्‍या वर्ड, आऊटलूक आणि पॉवरपॉइंट या अ‍ॅप्सचे अपडेट सादर केले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी हे अपडेट देण्यात आले आहे. यात युजर्सला अनेक नाविन्यपूर्ण फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. हे टुल्स जगभरातील प्रोफेशनल्स मोठ्या प्रमाणात वापरतात. या अनुषंगाने याची उपयुक्तता वाढविणार्‍या फिचर्सचा या अपडेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत पॉवरपॉइंट अ‍ॅपमध्ये लँडस्केप मोड असतांनाही स्लाईड एडिट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे यावर विविध प्रेझेंटेशन्स बनवितांना लाभ होणार आहे. ही सुविधा पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड युजर्सला देण्यात आली असली तरी येत्या काही दिवसांमध्ये याला आयओएससाठी सादर करण्यात येणार आहे.

मायक्रोसॉफ्टचे आऊटलूक अ‍ॅप वापरणार्‍यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. ताज्या अपडेटमध्ये यातदेखील काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात डू नॉट डिस्टर्ब हे नवीन फिचर देण्यात आले आहे. याचा वापर करून युजर आपल्याला हव्या नसणार्‍या वेळेतील ईमेल्सचे नोटिफिकेशन्स पॉज करू शकणार आहे. तसेच यात अ‍ॅपवरूनच कॉन्टॅक्ट डिलीट करण्याची सुविधादेखील आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यातील ड्राफ्ट सिंक हे फिचर होय. याचा वापर करून कुणीही एखादा इ-मेल स्मार्टफोनवर लिहण्यास प्रारंभ करून याला संगणकावर पूर्ण करू शकतो. तर याच्या अगदी विरूध्द म्हणजे संगणकावर सुरूवात करून स्मार्टफोनवर पूर्ण करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. तर मायक्रोसॉफ्ट वर्डच्या अपडेटमध्ये वर्ड काऊंट हे फिचर देण्यात आले आहे. यामुळे कुणीही मजकूर लिहतांना तो नेमक्या किती शब्दांचा आहे? याची माहिती मिळवू शकणार आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित नवीन गेमींग सेवा सुरू करण्याचे संकेतदेखील दिले आहेत. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान