शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

AI च्या काळात नोकरी कशी मिळवायची? Microsoft चे CEO सत्या नडेला म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:31 IST

Microsoft CEO Satya Nadella: 'तंत्रज्ञानाच्या या वेगाने मुलभूत गोष्टींचे महत्त्व कमी झालेले नाही.'

Microsoft CEO Satya Nadella: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वेगाने बदल घडवत आहे. या एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाणार, अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. परंतु मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा असा विश्वास आहे की, तंत्रज्ञानाच्या या वेगाने मुलभूत गोष्टींचे महत्त्व कमी झालेले नाही. प्रसिद्ध टेक युट्यूबर सज्जाद खडे याच्याशी झालेल्या संभाषणात नडेला यांनी नवीन तांत्रिक व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाचे सल्ला दिले आहेत.

एआयच्या युगात नोकरी कशी मिळवायची?नडेला म्हणाले की, जर तुम्हाला सॉफ्टवेअर अभियंता बनायचे असेल, तर तुम्हाला संगणकीय विचारसरणी आणि सिस्टम डिझाइनची मजबूत समज असणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, सॉफ्टवेअरची खरी मूलभूत समज आजही खूप महत्त्वाची आहे. एआय कोडिंगमध्ये मदत करत असले तरी, ते चालवण्याची आणि योग्य दिशेने वापरण्याची क्षमता ही मानवाकडेच आहे.

सत्या नाडेला यांचा सल्ला सज्जाद खडे यांनी विचारले की, आजच्या एआय युगात नवीन टेक व्यावसायिकांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला कोणता असेल, तेव्हा नडेला म्हणाले, एआय निश्चितपणे कोड लिहू शकते, परंतु विचार करणे, समस्या योग्यरित्या समजून घेणे आणि रचना तयार करणे, हे अजूनही माणसाचे काम आहे.

नाडेला यांनी गिटहब कोपायलटच्या मदतीने त्यांच्या कोडमधील बग दुरुस्त केल्याचा वैयक्तिक अनुभवही सांगितला. त्यांनी सांगितले की, ते फिल्टर आणि पर्सेंटाइलसह एक फिचरस तयार करत आहेत, जिथे SQL चे ज्ञान त्यांना योग्य दिशेने विचार करण्यास मदत करत होते. AI ने काम निश्चितच सोपे केले, परंतु विचार करण्याचे काम मलाच करावे लागले, असेही त्यांनी म्हटले.

...पण मानवांची भूमिका संपणार नाहीमायक्रोसॉफ्टमध्ये AI चा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नाडेला यांनी सांगितले की, कंपनीच्या अनेक प्रकल्पांमध्ये सुमारे 20 ते 30 टक्के कोड आता AI द्वारे लिहिले जात आहेत. यावरून असे दिसून येते की, येणाऱ्या काळात AI ची भूमिका आणखी वाढेल, परंतु मानवांची भूमिका संपणार नाही.

नाडेला यांनी मायक्रोसॉफ्ट बिल्ड 2025 मध्ये "एजेंटिक AI" चा देखील उल्लेख केला, जो भविष्यात तंत्रज्ञानाच्या प्रत्येक स्तरावर बदल घडवून आणणार आहे. तसेच, त्यांनी भारतात AI कौशल्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या (MeitY) सहकार्याने मायक्रोसॉफ्टने २०२६ पर्यंत ५ लाख लोकांना एआयशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. 

या अंतर्गत भारतातील १० राज्यांमध्ये २० एआय लॅबदेखील स्थापन केल्या जातील, जिथे २०,००० हून अधिक शिक्षकांना एआयचे मुख्य ज्ञान शिकवले जाईल. या संपूर्ण प्रयत्नाचा उद्देश भारतातील तरुणांनी तंत्रज्ञानात स्वावलंबी व्हावे आणि एआयशी चांगले समन्वय निर्माण करणे आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानmicrosoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडोjobनोकरी