शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

मास्टरस्ट्रोक! Micromax आणखी एक स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 09:41 IST

Micromax Re-entry : दोन बजेट फोन लाँच करत चिनी कंपन्यांना शह देण्याचा प्रयत्न Micromax ने केला.

मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने याच महिन्यात भारतीय बाजारात पुन्हा एन्ट्री केली आहे. दोन बजेट फोन लाँच करत चिनी कंपन्यांना शह देण्याचा प्रयत्न Micromax ने केला. आता आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीला मायक्रोमॅक्स लागली आहे. 

माय़क्रोमॅक्सचा हा फोन अँड्रॉईड गो ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असणार आहे.  या फोनचे नाव Micromax In 1b Go edition असण्याची शक्यता आहे. या फोनची टक्कर रियलमी, शाओमी या कंपन्यांच्या स्वस्त ब्रँडसोबत होणार आहे. गॅजेट ३६० नुसार हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होईल. 2GB RAM + 32GB आणि 4GB RAM + 64GB व्हेरिअंटमध्ये असेल. या फोनबाबत सध्या एवढीच माहिती उपलब्ध आहे. 

Micromax In 1B Micromax In 1B ची किंमत खूपच परवडणारी ठेवण्यात आली आहे. 6.5 इंचाचा HD+ रिझोल्युशन डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. माठीमागे 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. टाईप सी चार्जिंग कनेक्टिविटी देण्यात आली आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. 

Micromax In Note 1 देखील बाजारातMicromax In Note 1 मध्ये 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रिझोल्युशनसह देण्यात आला आहे. हे डिव्हाईस MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. गेमिंग करणाऱ्या युजरसाठी तो चांगला परफॉर्मन्स देतो. कॅमेरा सेटअप- AI क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 5 एमपी अल्ट्रा वाईड, २ एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Micromaxमायक्रोमॅक्सchinaचीनxiaomiशाओमी