शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

झकरबर्ग व्हॉट्सअ‍ॅप विकण्याची शक्यता; कारण काय? मेटाविश्वात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 15:59 IST

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कंपनीने WhatsApp वर सर्वाधिक पैसा गुंतविला होता. मात्र, कंपनीला यातून काही फायदा होताना दिसत नाहीय.

फेसबुकने आपल्या कंपन्यांच्या ग्रुपची वर्षभरापूर्वी बनविलेली मेटा कंपनी मेटाकुटीला आली आहे. मेटाच्या महसुलात पहिल्यांदाच घट झाली आहे. याचा थेट परिणाम मेटाच्या मालकीच्या मॅसेंजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर देखील झाला आहे. यामुळे कंपनी व्हॉट्सअ‍ॅप विकण्याची शक्यता आहे. 

रिपोर्टनुसार मेटाचा एकूण महसूल १ टक्क्याने घसरला आहे. यामुळे मेटाचे उत्पन्न जवळपास 28.8 बिलियन डॉलर म्हणजेच 23 हजार अब्ज रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्येही महसुलात मोठी तूट होण्याची शक्यता कंपनीने वर्तविली आहे. तिसऱ्या तिमाहीत हा महसूल 20 हजार अब्ज रुपये एवढा खाली येऊ शकतो. फेसबुकशिवाय मेटाचा एकूण नफा ३६ टक्क्यांनी घटला आहे. हा फायदा 6.7 अब्ज डॉलर एवढा झाला आहे. फेसबुकचा मेटाव्हर्सवर मोठी योजना आहे. यामुळे यात कंपनीने अब्जावधी डॉलर्स गुंतविले आहेत. हे मार्क झकरबर्गचे स्वप्न आहे आणि त्यावर खास डिव्हीजन Reality Labs काम करत आहे. या डिव्हिजनने गेल्या तिमाहीत 2.8 अब्ज डॉलर्सचा तोटा नोंदविला होता. 

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कंपनीने WhatsApp वर सर्वाधिक पैसा गुंतविला होता. मात्र, कंपनीला यातून काही फायदा होताना दिसत नाहीय. झकरबर्गला इन्स्टाग्रामवर लोकांना खिळवून ठेवायचे आहे. यासाठी इन्स्टाला ते TikTok सारखे बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. 

परंतू फेसबुकला महिला आणि तरुणांनी, अल्पवयीनांनी काहीशी नापसंती देण्यास सुरुवात केली आहे. ते फेसबुकवर जास्त सक्रीय नसतात. यामुळे कंपनीच्या वाढीवर परिणाम झाला आहे. याशिवाय अ‍ॅपल कंपनीने देखील फेसबुकविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. फेसबुक अ‍ॅपद्वारे युजरला टार्गेट करणाऱ्या जाहिरातदारांना अ‍ॅपल ब्लॉक करू लागली आहे. याचा मोठा परिणाम फेसबुकच्या रिव्हेन्यूवर झाला आहे. WhatsApp जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजिंग अ‍ॅप आहे, परंतू त्यावरून इन्स्टासारखा रेव्हेन्यू मिळत नाहीय. 

2012 मध्ये इंस्टाग्राम $1 अब्जांना विकत घेतले होते. त्याने २०१९ मध्ये फेसबुकला २० अब्ज डॉलर्सचा नफा कमवून दिला. त्यानंतर झकरबर्गने व्हॉट्सअ‍ॅप १९ अब्ज डॉलर्सना विकत घेतले होते. 

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMetaमेटा