शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

DeepSeek नंतर चीनने लॉन्च केले नवीन Ai असिस्टंट 'Manus', काय आहे खास? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:59 IST

Manus AI Assistant: चीनमध्ये नवीन शक्तिशाली Ai टूल 'Manus' सध्या चर्चेत आहे.

Manus AI Assistant: काही दिवसांपूर्वीच चीनचे DeepSeek Ai लॉन्च झाले आणि जगभरात खळबळ उडाली. चीनचे हे Ai, ChatGPT आणि Gemini सारख्या Ai प्लॅटफॉर्मला टक्कर देत आहे. दरम्यान, आता चीनमध्ये आणखी एक शक्तिशाली Ai टूल 'Manus' तयार करण्यात आले आहे. हे नवीन Ai एजंट साध्या चॅटबॉटपेक्षा अधिक उपयुक्त मानले जात आहे. शेअर बाजाराचे विश्लेषण करण्यापासून ते सहलींसाठी वैयक्तिक मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यापर्यंत...अनेक कामांमध्ये हे सक्षम असल्याचा दावा केला जातोय. 

'Manus' कसे काम करते?चायनीज स्टार्टअप बटरफ्लाय इफेक्टने हे 'Manus' Ai लॉन्च केले आहे. कंपनीचे सह-संस्थापक यिचाओ पीक जी यांनी या Ai ne मानव आणि मशीन सहकार्याचे एक नवीन युग म्हटले आणि याला कृत्रिम बुद्धिमत्ता (Ai) च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले.

सध्या हे Ai टूल फक्त इनव्हाइटद्वारे उपलब्ध आहे, परंतु असे असूनही त्याचा अधिकृत डिस्कॉर्ड सर्व्हर 1.7 लाखांहून अधिक सदस्यांपर्यंत पोहोचला आहे. याचे नाव लॅटिन शब्द "Mens et Manus" वरुन घेतला आहे. याचा अर्थ "मन आणि हात" असा आहे. हे ज्ञान आणि व्यावहारिक अनुप्रयोगाच्या संयोजनाचे प्रतीक आहे.

'Manus' इतर एआय टूल्सपेक्षा वेगळे कसे आहे?सिंगापूरच्या एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (RSIS) चे संशोधक मनोज हरजानी यांच्या मते, Manus इतर चॅटबॉट्सपेक्षा चांगले आहे, कारण ते युजरच्या वतीने स्वायत्तपणे कार्य करू शकते. तर DeepSeek आणि ChatGPT केवळ चॅट इंटरफेसमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. Manus तिकीट बुकिंग स्वयंचलित करू शकते, फिल्टरिंग आणि इतर रिअल-टाइम कार्येदेखील पुन्हा सुरू करू शकते. 

Ai सेन्सॉरशिप आणि संवेदनशील मुद्देDeepSeek ला चिनी सरकारच्या धोरणांनुसार उत्तरे देण्यासाठी प्रोग्रॅम केले गेले होते, परंतु Manus सेन्सॉर न करता निष्पक्ष उत्तरे देण्यास सक्षम आहे. 1989 च्या तियानमेन स्क्वेअर घटनेबद्दल जेव्हा मानुसला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने "लोकशाही समर्थक आंदोलकांच्या विरोधात चीन सरकारने केलेली हिंसक कारवाई" असे वर्णन केले आणि घटनेचे तपशीलवार वर्णन केले. 

टॅग्स :chinaचीनArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञान