शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पेन ड्राइव्ह वापरताना 'ही' चूक करताय? क्षणात गायब होईल आयुष्यभराचा डेटा; वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:38 IST

पेन ड्राइव्ह वापरताना आपण केलेली एक छोटीशी निष्काळजी तुमच्या आयुषभराचा डेटा कायमचा नष्ट करू शकते.

आजच्या डिजिटल युगात पेन ड्राइव्ह ही आपल्या जीवनातील एक अविभाज्य वस्तू बनली आहे. ऑफिसचे महत्त्वाचे कागदपत्र असोत, कॉलेजचे प्रोजेक्ट्स किंवा कुटुंबाचे जुने फोटो, आपण सर्व काही या इवल्याशा डिव्हाइसमध्ये सुरक्षित ठेवतो. मात्र, पेन ड्राइव्ह वापरताना आपण केलेली एक छोटीशी निष्काळजी तुमच्या आयुषभराचा डेटा कायमचा नष्ट करू शकते. जर तुम्हीही घाईघाईत पेन ड्राइव्ह वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

थेट पेन ड्राइव्ह काढणे ठरू शकते महागात!

बहुतेक लोक डेटा ट्रान्सफर झाल्यानंतर थेट पेन ड्राइव्ह सिस्टिममधून खेचून काढतात. ही सर्वात मोठी आणि सामान्य चूक आहे. अनेकदा फाईल कॉपी झाल्याचे दिसत असले तरी, बॅकग्राउंडमध्ये काही प्रोसेस सुरू असतात. अशा वेळी थेट डिव्हाइस काढल्याने 'फाईल करप्ट' होण्याचा किंवा संपूर्ण पेन ड्राइव्हच 'डेड' होण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी 'Safely Remove Hardware' किंवा 'Eject' या पर्यायाचा वापर करूनच तो बाहेर काढावा.

व्हायरसचा धोका आणि चुकीची साठवणूक

आपला पेन ड्राइव्ह वेगवेगळ्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला लावणेही धोक्याचे असते. ज्या सिस्टिममध्ये अपडेटेड अँटीव्हायरस नाही, तिथून तुमच्या पेन ड्राइव्हमध्ये व्हायरस शिरू शकतो. यामुळे फाईल्स हाइड होणे किंवा त्या न उघडणे अशा समस्या उद्भवतात. याशिवाय, पेन ड्राइव्ह उष्णता, धूळ किंवा ओलावा असलेल्या ठिकाणी ठेवल्यास त्यातील इलेक्ट्रॉनिक सर्किट खराब होऊ शकते.

ओव्हरलोडिंग टाळा आणि बॅकअप ठेवा

अनेकजण पेन ड्राइव्ह पूर्ण क्षमतेने भरतात. सतत फुल स्टोरेज ठेवल्याने डिव्हाइसची कामगिरी मंदावते आणि डेटा करप्ट होण्याचे प्रमाण वाढते. तसेच, केवळ पेन ड्राइव्हवर अवलंबून राहणे ही मोठी चूक आहे. तांत्रिक बिघाड कधीही होऊ शकतो, त्यामुळे महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप 'क्लाउड स्टोरेज' किंवा 'हार्ड ड्राईव्ह'वर ठेवणे कधीही शहाणपणाचे ठरते.

कशी घ्याल काळजी?

- पेन ड्राइव्ह नेहमी 'Eject' करूनच काढा.

- अनोळखी किंवा संशयास्पद सिस्टिमला पेन ड्राइव्ह लावणे टाळा.

- वेळोवेळी अँटीव्हायरसने स्कॅन करा.

- अति उष्णता आणि पाण्यापासून डिव्हाइस दूर ठेवा.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान