शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: अल्गोरिदम म्हणजे काय? आणि एआयमधील महत्त्वाची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 21:21 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: हाच क्रम आणि शिस्त संगणकाच्या भाषेत अल्गोरिदम म्हणून ओळखला जातो.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आपण आयुष्यात अनेक रोजच्या कामे ठरावीक क्रमाने करतो. सकाळी उठल्यानंतर दात घासणे, अंघोळ करणे, नाश्ता करणे आणि शाळेत जाणे. हा सगळा एक ठरलेला क्रम असतो. जर हा क्रम बदलला, तर गोंधळ होऊ शकतो. हाच क्रम आणि शिस्त संगणकाच्या भाषेत अल्गोरिदम म्हणून ओळखला जातो.

अल्गोरिदम म्हणजे नेमके काय?

एखादे काम पूर्ण करण्यासाठी दिलेल्या स्पष्ट, नेमक्या आणि क्रमवार सूचनांना अल्गोरिदम म्हणतात. संगणक, मोबाइल किंवा मशीन स्वतःहून विचार करू शकत नाहीत. त्यांना आपण ज्या सूचना देतो, त्या जशाच्या तशा पाळून ते काम करतात. त्या सूचनांचा संच म्हणजेच अल्गोरिदम.

उदाहरणार्थ, चहा बनवण्याचा अल्गोरिदम असा असू शकतो-पाणी उकळा, चहापत्ती घाला, साखर घाला, दूध घाला आणि चहा उकळल्यावर चहा तयार. या पायऱ्यांपैकी एखादी पायरी चुकली, तर चहा चांगला होत नाही. संगणकाच्या बाबतीतही तसेच असते. संगणक आणि अल्गोरिदम संगणकाचे प्रत्येक छोटे-मोठे काम अल्गोरिदमवर चालते. कॅल्क्युलेटरने बेरीज करणे, मोबाइलवर फोटो काढणे, मेसेज पाठवणे किंवा इंटरनेटवर माहिती शोधणे या सर्वामागे वेगवेगळे अल्गोरिदम कार्यरत असतात. म्हणजेच अल्गोरिदम हा संगणकाचा कणा आहे, असे आपण म्हणूया.

मग एआय म्हणजे काय?

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे अशी संगणकीय प्रणाली जी माणसाप्रमाणे शिकू शकते, निर्णय घेऊ शकते आणि अनुभवातून स्वतःला सुधारु शकते. साधा संगणक फक्त दिलेल्या सूचनांवर काम करतो, पण एआय त्यापेक्षा पुढे जाऊन शिकतो.

एआय कसे शिकते?

अल्गोरिदममध्ये चुका होऊ शकतात. ते आधी चूक करतात, मग त्यांतून शिकतात आणि पुढच्या वेळी अधिक अचूक उत्तर देतात. यास मशीन लर्निंग म्हणतात. म्हणजेच एआय जितका जास्त डेटा पाहतो, तितका तो अधिक हुशार बनतो.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे

विद्यार्थ्यांनी अल्गोरिदम म्हणजे काय, ते कसे काम करतात आणि एआय कसा तयार होतो हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. यामुळे विचार करण्याची शिस्त, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तांत्रिक समज वाढते.

अल्गोरिदमची भूमिका

एआयचा खरा आधार म्हणजे अल्गोरिदम. एआयमध्ये वापरले जाणारे अल्गोरिदम सामान्य नसतात; ते खूप प्रगत असतात. हे अल्गोरिदम मोठ्या प्रमाणात माहिती (डेटा) घेतात, त्यामधील पॅटर्न शोधतात आणि त्यावरुन निष्कर्ष काढतात. उदा. मोबाइल फोन आपला चेहरा ओळखतो, कारण त्यामागे चेहरा ओळखणारा अल्गोरिदम असतो. गुगल आपल्याला हवी असलेली माहिती पटकन दाखवतो, कारण त्याचा अल्गोरिदम कोट्यवधी वेबपानांमधून योग्य माहिती शोधतो. यूट्यूब/नेटफ्लिक्स आपल्याला आवडतील असे व्हिडीओ/चित्रपट सुचवतात, कारण त्यांचे अल्गोरिदम आपल्या पाहण्याच्या सवयी शिकतात.

THE BRAIN OF AI

An algorithm is a step-by-step method to solve a problem. Artificial Intelligence (AI) uses algorithms to learn from data, recognize patterns, and make smart decisions. Algorithms work as the brain of Al, helping machines understand language, images, and user behavior.

Moral - Clear thinking creates smart humans, and clear algorithms create smart machines.

निष्कर्ष

अल्गोरिदम हा संगणकाचा मेंदू आहे, तर एआय ही त्या मेंदूला शिकण्याची दिलेली ताकद आहे. योग्य अल्गोरिदम नसतील, तर एआय अचूक काम करु शकत नाही. म्हणूनच अल्गोरिदम आणि एआय हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.

- अविनाश जाधव, (एआय आणि टेक एज्युकेटर) 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Understanding Algorithms and Their Crucial Role in AI

Web Summary : Algorithms are step-by-step instructions essential for computers and AI. AI learns from data using algorithms, enabling smart decisions. Understanding algorithms is crucial for students in the age of rapidly developing AI.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान