Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आपल्या अन्न शिजते. काही घरात रोज वेळा जास्त बनते, काही वेळा उरते, तर काही वेळा फ्रिजमध्ये ठेवून विसरले जाते. दोन-तीन दिवसांनी ते खराब होते आणि शेवटी कचरापेटीत जाते. हे दृश्य इतके सामान्य झाले आहे की आपण त्याला 'नासाडी' मानतच नाही.
पण हा प्रश्न फक्त घरापुरता नाही. हॉटेल, शाळा, लग्नसमारंभ, बाजारपेठा, साठवणूक केंद्रे सगळीकडे अन्न वाया जाते.
स्वयंपाक करणारे यंत्र नाही.
एआय म्हणजे अन्न किती लागेल, किती वापरले जाईल, आणि किती वाया जाऊ शकते हे आधीच ओळखणारी बुद्धी. अन्नाची नासाडी म्हणजे नेमकं काय वाया जातं? आपल्याला वाटतं अन्न वाया जातं. पण प्रत्यक्षात वाया जातं - पाणी, जमीन, श्रम, ऊर्जा आणि वेळ एका भाताच्या ताटामागे पाणी, वीज, खतं, वाहतूक, माणसांचा घाम हे सगळं असतं. अन्न फेकणं म्हणजे हे सगळं फेकणं. एआय इथे चित्र मोठ्या चौकटीत पाहते. एआय अन्नाच्या वापराचा अंदाज कसा लावते?
भूतकाळातील डेटा पाहतात :
रोज किती अन्न वापरलं जातं, कोणत्या दिवशी जास्त उरतं, कोणते पदार्थ पटकन खराब होतात. ऋतूनुसार खाण्याच्या सवयी कशा बदलतात. या डेटावर आधारित प्रिडिक्शन मॉडेल तयार होतात. ही मॉडेल्स सांगतात : आज किती अन्न पुरेल, उद्या किती लागेल आणि कुठे जास्त बनवणं टाळता येईल. हा अंदाज माणसाच्या डोक्याने करणे कठीण आहे, पण एआयसाठी ते शक्य आहे.
घरगुती पातळीवर एआय कशी मदत करते? एआय आधारित सिस्टीम : कोणते पदार्थ आधी संपवायला हवेत हे सांगतात. कोणत्या अन्नाची मुदत संपत येतेय याची आठवण करून देतात. आठवड्याचा जेवणाचा आराखडा सुचवतात. गरजेपेक्षा जास्त खरेदी टाळायला मदत करतात. यामुळे घरात अन्नाची किंमत कळू लागते. फक्त पैशांत नाही, तर मूल्य म्हणून. अन्न खराब होण्याआधी वापरले जाते. अनावश्यक खरेदी कमी होते.
मोठ्या पातळीवर काय बदल होतो?
एआयचा वापर मोठ्या स्वयंपाकगृहांमध्ये, शाळा, वसतिगृहे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केल्यास : मागणीचा अचूक अंदाज मिळतो. जास्त शिजवणं टाळता येतं. उरलेलं अन्न योग्य ठिकाणी वळवता येतं. AI इथे फक्त गणित करत नाही. ती जबाबदारी निर्माण करते.
वापरली जाणारी एआय मॉडेल डिमाण्ड प्रिडिक्शन मॉडेल्स
→ किती अन्न लागेल याचा अंदाज एक्सपायरी अलर्ट सिस्टिम्स
→ अन्न खराब होण्याआधी सूचना पॅटर्न अॅनालिसिस मॉडेल्स
→ कोणते पदार्थ जास्त वाया जातात हे ओळखतात टाइम सेव्हिंग मॉडेल्स
→ नियोजन सोपं आणि जलद करतात एआय सांगत नाही हे खा.
ही सिस्टीम्स माणसाला अत्रावर नियंत्रण ठेवायला शिकवतात - अन्न माणसावर नाही.
निसर्गाशी थेट संबंध
अन्न कमी वाया गेले म्हणजे : कमी शेती जमीन लागते. कमी पाणी वापरले जाते. कमी रसायने लागतात. निसर्गावरचा ताण घटतो.
अन्नाची नासाडी थांबवणे म्हणजे निसर्गाचं संरक्षण करणे.
वाया गेलेले अन्न = वाया गेलेले पाणीकमी नासाडी = अधिक शाश्वत शेतीयोग्य वापर = पर्यावरण संतुलनअन्न बचत = संसाधन बचत
The Extra Plate
Arun always filled his plate, even when he was not hungry. One day, a simple reminder showed how much food he wasted each week. He started taking smaller portions. Slowly, nothing went to the dustbin. Arun learned that food is not just something we eat-it carries water, soil, and effort. Saving food did not make him poorer; it made him wiser. True intelligence is not eating more, but wasting less.
निष्कर्ष
एआय अन्न बनवत नाही. ते अन्नाचे मूल्य ओळखायला शिकवते. अन्न कमी वाया जाणे म्हणजे : कमी निसर्ग नासाडी, कमी अन्याय आणि अधिक जबाबदार समाज. एआय इथे तंत्रज्ञान नाही, ती एक शांत जाणीव आहे.
- अजिंक्य देशमुख
Web Summary : AI revolutionizes food waste management, from homes to large scale. It predicts consumption, minimizes excess, and promotes responsible usage. Saving food means saving resources and protecting the environment. AI teaches the value of food, fostering a sustainable and equitable society.
Web Summary : एआई भोजन की बर्बादी को प्रबंधित करने में क्रांति लाता है, घरों से लेकर बड़े पैमाने तक। यह खपत की भविष्यवाणी करता है, अतिरिक्त को कम करता है, और जिम्मेदार उपयोग को बढ़ावा देता है। भोजन बचाने का मतलब है संसाधनों को बचाना और पर्यावरण की रक्षा करना। एआई भोजन के मूल्य को सिखाता है, एक स्थायी और न्यायसंगत समाज को बढ़ावा देता है।