शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: अलेक्सा - यंत्रामधील नवा संवाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:13 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट यांसारखी स्मार्ट गॅजेट्स आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहेत.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: पूर्वी माणूस फक्त माणसांशीच बोलायचा. आज मात्र आपण यंत्रांशीही बोलतो आणि ती आपल्याला उत्तरही देतात. सिरी, आता किती वाजले? अलेक्सा, उद्या शाळा आहे का? आणि किती वाजता? अशा साध्या प्रश्नांना काही सेकंदांत मिळणारं उत्तर हे आजच्या तंत्रज्ञानाचं मोठं वैशिष्ट्य आहे. अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट यांसारखी स्मार्ट गॅजेट्स आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहेत. ही गॅजेट्स फक्त बोलत नाहीत, तर आपला आवाज ओळखतात, प्रश्न समजून घेतात आणि योग्य माहिती देतात. हे सगळं शक्य होतं, कारण यामागे कार्यरत असते कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय).

AI म्हणजे नेमकं काय?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा मशीनना माणसासारखी काही कामं करता येतील अशी क्षमता देणं. AI मुळे मशिन्स ऐकू शकतात. भाषा समजू शकतात. माहिती शोधू शकतात. शिकू शकतात. निर्णय घेण्यास मदत करू शकतात. म्हणूनच अलेक्सा किंवा सिरी आपल्याला हळूहळू अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतात.

ही गॅजेट्स कसं शिकतात?

आपण जितकं जास्त वापर करतो, तितकी ही गॅजेट्स आपल्याकडून शिकतात. आपली भाषा, उच्चार, आवडती गाणी, वारंवार विचारलेले प्रश्न हे सगळं लक्षात ठेवून त्या अधिक अचूक उत्तर देऊ लागतात. यालाच मशीन लर्निंग म्हणतात.

मुलांच्या शिक्षणात उपयोग

लहान वयोगटासाठी - अभ्यास मजेशीर होतो. गोष्टी, कविता, प्रश्नोत्तरे ऐकता येतात. जिज्ञासा वाढते. मोठ्या गटासाठी प्रोजेक्टसाठी माहिती मिळते. विज्ञान, गणित, इतिहास समजून घेता येतो. वेळेचं नियोजन करता येतं. म्हणजेच AI हे शिकण्यासाठीचं साहाय्यक साधन बनलं आहे यात शंका नाही.

पण काही मर्यादाही आहेत..

ही गॅजेट्स कितीही स्मार्ट असली तरी, त्यांना भावना नसतात. स्वतःहून चांगलं-वाईट ठरवता येत नाही. दिलेल्या माहितीवरच ती काम करतात. म्हणूनच चुकीची माहिती विचारणे, जास्त वेळ वापरणे किंवा त्यांच्यावर पूर्ण अवलंबून राहणे हे टाळायला हवं.

घरातील डिजिटल हेल्पर

आज अनेक घरांमध्ये स्मार्ट लाईट, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फॅन असतात. अलेक्सा किंवा सिरीच्या मदतीने हे सगळं आवाजाने नियंत्रित करता येतं. वृद्ध व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती किंवा व्यस्त पालकांसाठी ही गॅजेट्स खूप उपयोगी ठरतात.

तंत्रज्ञान आणि जबाबदारी

मोबाईल, AI आणि स्मार्ट गॅजेट्स यांचा वापर मर्यादेत आणि शहाणपणाने केला पाहिजे.

खेळ, वाचन, प्रयोग, मित्र-मैत्रिणींशी संवाद हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे.

AI आपली बुद्धी वाढवायला मदत करू शकतो, पण आपल्या जागी विचार करु शकत नाही.

Al Around Us

Alexa, Siri, and smart gadgets are examples of Artificial Intelligence in our daily life. They can listen to our voice, understand questions, and give quick answers. These smart assistants help us in studies, daily tasks, and learning new things. They make technology easy, fast, and user friendly for everyone. However, these gadgets do not think like humans. They work only on the information given to them. So, we must use them wisely and for the right purpose.

Moral Technology should support our thinking, not replace it. Use Al smartly, but always trust your own intelligence first.

- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर) 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Exploring Alexa and the World of Artificial Intelligence

Web Summary : AI-powered gadgets like Alexa are transforming daily life, aiding learning and simplifying tasks. While these tools offer convenience, responsible use and critical thinking remain crucial. They enhance, but don't replace, human intelligence.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान