Lokmat AI ची अद्भूत दुनिया: मागील सदरात आपण एआयची व्याख्या, मानवी बुद्धिमत्ता व एआयबद्दल जाणून घेतले. आजच्या सदरात एआय स्तर किंवा प्रकार याबद्दल माहिती करून घेणार आहोत. एआयची उत्क्रांती ही टप्याटप्याने झाली असून, तिचे मुख्यतः तीन प्रकार किंवा स्तर मानले जातात.
१. विक (नॅरो) एआय२. जनरल (स्ट्रॉग) एआय३. सुपर इंटेलिजन्स सिंग्युलॅरिटी
१. विक (नॅरो) - एआय हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्राथमिक आणि सध्या सर्वाधिक वापरात असलेला प्रकार आहे. हा एआय विशिष्ट आणि मर्यादित कामांसाठी डिझाईन केला जातो. एक उदाहरण घेऊ, आपल्या मोबाइलमधील 'बोलणे से सब होता है' हे गुगलचे व्हॉइस असिस्टंट, अॅमेझॉन अलेक्सा, एप्पल सिरी आदी यांना जेव्हा आपण सांगतो 'प्ले धुरंदर साँग' तेव्हा या मशीन्स, प्रथम या ध्वनी रूपे शब्दांचे लिखित शब्दांमध्ये रूपांतर करतात. मग, तेच शब्द अॅमेझॉन म्युझिक, गाना यासारख्या म्युझिक अॅप्लिकेशन्समध्ये सर्च करून आलेल्या पर्यायांमधून सर्वात योग्य ती निवड करून गाणी ऐकवतात. यामध्ये ध्वनी रुपी शब्दांचे लिखित शब्दांमध्ये रूपांतर करणे ही एक प्रकारची मानवी बुद्धिमत्ता नक्कीच आहे, परंतु या अलेक्सा, गुगल असिस्टंटला बोललेले शब्द ओळखणे त्याचे लिखित शब्दांमध्ये रूपांतर करणे (स्पीच टू टेक्स्ट), सर्च करणे इतकेच काय ते मर्यादित कार्य सिस्टीमकडून अपेक्षित असते. परंतु, हे कार्य अत्यंत कुशलतेने आत्मसात करणे आचरणात आणणे अपेक्षित असते.हा स्तर किंवा प्रकार बुद्धिमान वाटत असला तरी तो स्वतःहून विचार करत नाही दिलेल्या डेटावर नियमांवर आणि अल्गोरिदमवर आधारितच तो निर्णय घेतो. आज शेती, बँकिंग आणि उद्योग क्षेत्रात वापरली जाणारी बहुतांश एआय प्रणाली या वीक यायच्या श्रेणीत येतात.
२. जनरल (स्ट्रॉग) - एआय जनरल एआय हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुढील आणि अधिक प्रगत टप्पा आहे. यामध्ये माणसासारखी समज, तर्कशक्ती, शिकण्याची क्षमता आणि निर्णय क्षमता असते. म्हणजेच एकच एआय प्रणालीद्वारे विविध प्रकारची कामे करता येऊ शकतात. हा एआय अनुभवातून शिकू शकतो, नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो आणि मानवी मेंदूप्रमाणे विचार करू शकतो. हे कदापि शक्य आहे का? सध्या असा एआय प्रत्यक्षात पूर्णपणे अस्तित्वात आलेला नसला तरी जगभरात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. भविष्यात जनरल एआय शिक्षण संशोधन वैज्ञानिक शोध आणि गुंतागुंतीच्या समस्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
३. सुपर इंटेलिजन्स - सुपर इंटेलिजन्स हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वात प्रगत आणि भविष्यकालीन टप्पा मानला जातो. या स्तरावरील एआय मानवी बुद्धिमत्तेपेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगवान, अचूक आणि शक्तिशाली असेल. ते स्वतःहून संशोधन करू शकेल, नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकेल आणि अवघड वैज्ञानिक व जागतिक समस्या सोडवू शकेल. थोडेसे भीतीदायक आहे नाही का? मानवी नियंत्रण, नैतिकता, गोपनीयता आणि सुरक्षितता यासंबंधी प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे सुपर इंटेलिजन्सचा विकास अत्यंत जबाबदारीने आणि नियमबद्ध पद्धतीने करणे आवश्यक आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.
The Exam That Finally Made Sense
Arjun studied hard, but he did not understand his mistakes. After every exam, he only saw his marks. An Al learning system checked his answers and showed him which topics he found difficult. It explained his mistakes step by step. Now Arjun knew what to practise and how to improve. Slowly, his marks became better and he felt more confident. Al did not do the learning for him. It helped him learn in a smarter way. - Ajinkya Deshmukh.
कृत्रिम बुद्धिमत्तेची उत्क्रांती ही मानवी ज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पकतेची फलश्रुती आहे. विक आयपासून सुपर इंटेलिजन्सपर्यंतचा हा प्रवास मानव जातीसाठी संधी सोबत आव्हानेही घेऊन येतो. मनुष्य प्राणी हा युगा युगांपासून अनंत नैसर्गिक अडचणींवर त्याच्या कितीतरी पट बलवान प्राण्यांवर मात करीत आला आहे, ते फक्त आपल्या बुद्धीच्या आणि टिकून राहण्याच्या जिद्दीच्या जोरावर. हीच मानसिकता आपल्याला यापुढे तारणार आहे. पुढचे युग हे माणूस विरुद्ध मशीन नसून मॅन-मशीन यांच्या भागीदारीचे असेल. मानवी हित लक्षात ठेवून एआयचा वापर केल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता समाजाच्या प्रगतीसाठी एक प्रभावी साधन ठरू शकते.
- शशिकांत शिंदे, सहायक प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा
Web Summary : AI's evolution is categorized into Narrow, General, and Super Intelligence. Narrow AI is currently prevalent, while General AI remains under research. Super Intelligence poses both opportunities and challenges, requiring responsible development for societal progress. Man-machine collaboration is the future.
Web Summary : एआई का विकास नैरो, जनरल और सुपर इंटेलिजेंस में वर्गीकृत है। नैरो एआई वर्तमान में प्रचलित है, जबकि जनरल एआई अनुसंधान के अधीन है। सुपर इंटेलिजेंस अवसर और चुनौतियां दोनों प्रस्तुत करता है, जिसके लिए सामाजिक प्रगति के लिए जिम्मेदार विकास की आवश्यकता है। मानव-मशीन सहयोग भविष्य है।