शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गुगलचा सीईओ व्हायचंय? लिंक्डइननं दिली ऑफर; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 15:57 IST

लिंक्डइनवरील पोस्ट पाहून अनेकांचे अर्ज

सॅन फ्रान्सिस्को: गुगलसारख्या कंपनीत काम करायची संधी मिळाल्यास अनेकांना आनंद होईल. त्यामुळे गुगलमध्ये काम करण्याची संधी कोणीही सहजासहजी सोडणार नाही. त्यात जर गुगलमध्ये थेट सीईओ पदावर काम करण्याची ऑफर मिळाली, तर मग कोणाचाही आनंद गगनात मावणार नाही. असाच काहीसा अनुभव लिंक्डइन युजर्सना आला. आज सकाळी लिंक्डइननं गुगलच्या सीईओ पदासाठी अर्ज मागवले. गुगलसारख्या कंपनीचा सीईओ होण्याची संधी कोण सोडेल? त्यामुळेच अनेकांनी लगेच यासाठी अर्जदेखील केले. मात्र काही वेळातच काही तांत्रिक कारणामुळे लिंक्डइनकडून ही चूक झाल्याचं समोर आलं. त्यामुळे अनेकांचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंची जागा घेण्याचं 'सुंदर' स्वप्न भंगलं. एका सिक्युरिटी बगमुळे हा प्रकार घडल्याचं लिंक्डइननं स्पष्ट केलं. या सिक्युरिटी बगमुळे कोणत्याही कंपनीच्या लिंक्डइन पेजवरुन नोकरीसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. मिशेल रिजिंडर्स यांनी गुगलच्या सीईओ पदासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अचानक मिशेल यांची पोस्ट लिंक्डइनकडून लाईव्ह झाली. यानंतर अनेकांनी गुगलच्या सीईओ पदासाठी अर्ज केले. ही बाब लक्षात येताच लिंक्डइननं माफी मागितली. ती पोस्ट नेमकी कशी लाईव्ह झाली, याचा शोध घेत असल्याचं ते म्हणाले. लिंक्डइनवर जॉब पोस्ट करताना प्रीमियम सबस्क्रिप्शनची आवश्यकता असते. मात्र असं कोणतंही सबस्क्रिप्शन नसताना मिशेल यांनी मोफत पोस्ट केली. लिंक्डइन बोगस नोकऱ्यांसाठी नसल्याचं यानंतर कंपनीनं स्पष्ट केलं. बोगस नोकऱ्यांच्या ऑफर आमच्या यूजर्सपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं लिंक्डइननं म्हटलं. लिंक्डइनचा वापर नोकरी शोधण्यासाठी केला जातो. उमेदवार आणि कंपन्या यांच्यातील दुवा म्हणून लिंक्डइन काम करतं.