शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

30 तासांच्या बॅटरी बॅकअपसह Lava Probuds N1 ब्लूटूथ नेकबँड लाँच; किंमत देखील किफायतशीर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 17:41 IST

Budget Blutooth Earphones Under 1500 Rs: Lava Probuds N1 नेकबँड-स्टाइल ब्लूटूथ एयरफोन्स सादर केले आहेत. जे 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात असा दावा कंपनीने केला आहे.  

लावाने भारतात Lava Probuds N1 नावाचे नवीन नेकबँड-स्टाइल इयरफोन सादर केले आहेत. हे इयरफोन इन-इयर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. तसेच यात ड्युअल कनेक्टिविटी आणि कॉलसाठी व्हायब्रेशन अलर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. जे 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात असा दावा करण्यात आला आहे.  

Lava Probuds N1 ची किंमत  

Lava Probuds N1 इयरबड्सची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर देखील खरेदीसाठी उपलब्ध होतील. ग्राहकांना Charcoal Grey आणि Berry Blue अशा दोन रंगांमधून एकाची निवड करता येईल.  

स्पेसिफिकेशन  

या इयरफोनमध्ये मेटल आणि सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही इयरटीप्सच्या मागे चुंबक आहे जो दोन्ही इयरटीप्सचा एकत्र ठेवतो. तर इयरप्लग्ससाठी सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे. Lava Probuds N1 मध्ये 10mm चे ड्युअल ड्रायव्हर्स आहेत. हा डिवाइस IPX5 वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.  

Lava Probuds N1 मध्ये पॉवर ऑन-ऑफ करण्यासाठी एक स्लाइडर बटण मिळतो. यातील ड्युअल कनेक्टिविटी फीचरच्या मदतीने एकसाथ दोन डिवाइस कनेक्ट करता येतील. Bluetooth v5 सह येणारे हे इयरफोन्स इनकमिंग कॉलसाठी व्हायब्रेशन अलर्ट देखील देतात.  

Lava Probuds N1 मध्ये 220mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी फक्त 20 मिनिटांच्या चार्जवर 8 तासांचा प्ले-बॅक देतात. फुल चार्ज केल्यावर हे इयरबड्स 30 तासांचा प्ले-बॅक टाइम आणि 200 तास स्टॅन्डबाय टाइम देऊ शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.  

टॅग्स :lavaलावाtechnologyतंत्रज्ञान