शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

लावाचे चार नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Updated: October 10, 2017 14:43 IST

लावा या भारतीय कंपनीने चार नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात झेड ६०, झेड ७०, झेड ८० आणि झेड ९० यांचा समावेश आहे.

लावा कंपनीने भारतात आपल्या झेड मालिकेत चार नवीन स्मार्टफोन सादर केले असून ते सर्व विविध शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. या चारही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ५,५००; ८,०००; ९,००० आणि १०७५० रूपये असेल. 

लावा झेड ९०

लावा झेड ९० हे या चारही स्मार्टफोनमधील सर्वात उत्तम फिचर्सने सज्ज असणारे मॉडेल आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. अर्थात याच्या मागील बाजूस ८ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. या दोन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. लावा झेड ९० या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने युक्त असणार्‍या या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असेल. यातील बॅटरी २७५० मिलीअँपिअर क्षमतेची असून या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर लावा कंपनीचा स्टार ४.१ हा युजर इंटरफेस असेल. हा स्मार्टफोन गोल्ड आणि ब्ल्यू या दोन रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल.

लावा झेड ८०

या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर असेल. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हा स्मार्टफोन ड्युअल सीमकार्डला सपोर्ट करणारा असून गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच हे मॉडेलदेखील अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर लावा कंपनीचा स्टार ४.१ हा युजर इंटरफेस असेल. तर यातील बॅटरी २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

लावा झेड ७०

हा स्मार्टफोन ५ इंची आकारमानाच्या आणि एचडी क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज असेल. यात मीडियाटेक एमटी६७३७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. यातील फिंगरप्रिंट स्कॅनर हे स्मार्टफोन लॉक/अनलॉक करण्यासोबत विविध अ‍ॅप्सच्या वापरासह सेल्फी घेण्यासाठी वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल व्हाईट गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.

लावा झेड ६०

हा स्मार्टफोन या मालिकेतील एंट्री लेव्हलचा आहे. यातील पाच इंच आकारमानाचा डिस्प्ले एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर पॉवर सेव्हर मोडसह यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेचे आहे. हे मॉडेल गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल