Passport Correction : पासपोर्ट हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. अनेक जण ओळखीचा पुरावा म्हणूनही पासपोर्टचा वापर करतात. परंतु पासपोर्टमध्ये झालेली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. परंतु जर तुमच्या पासपोर्टमध्ये एखादी चूक असेल तर तुम्ही ती घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनं दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्हाला काहीही विशेष करण्याची गरज नाही. यासाठी केवळ एक ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. आज आपण जाणून घेऊ याची संपूर्ण प्रक्रिया.
पासपोर्टमध्ये दुरूस्ती करण्यासाठी, प्रथम तुम्हाला पासपोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. क्राहकांची फसवणूक करणाऱ्या अनेक साइट्स आहेत, तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. अशा स्थितीत तुम्ही ज्या साईटला साइटवर आहात ती सरकारनं तयार केलेली अधिकृत साईट आहे की नाही हे पडताळणं आवश्यक आहे. साईटवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्हाला नवीन पासपोर्ट घ्यायचा असला तरी तुम्हाला त्याच ठिकाणी अर्ज करावा लागेल.
तसेच, जर तुम्हाला पासपोर्टमध्ये दुरुस्ती करायची असेल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. येथे तुम्हाला प्रथम लॉग-इन दिसेल. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय असतील. तुम्हाला यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला काय दुरुस्त करायचे आहे ते सांगावं लागेल. आता तुम्हाला जे काही दुरुस्त करायचं आहे त्यासोबत तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यावं लागेल. जे दुरूस्त करायचं आहे त्याच्याशी निगडीत एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल. या ठिकाणीच तुम्हाला अपॉईंटमेंटचाही पर्याय मिळेल.
पासपोर्ट केंद्रात जाएकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन तुम्हाला हे सांगावं लागेल. तुम्हाला काय दुरुस्त करायचे आहे आणि तुम्हाला तिथे जाऊन तुमच्या कागदपत्राची प्रिंट आउट द्यावी लागेल. यानंतर, १ महिन्याच्या आत, तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी पोहोचेल. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला शुल्कदेखील भरावे लागेल.