शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Karbonn ने केली कमाल! फक्त 7,990 रुपयांमध्ये मेड इन इंडिया Smart TV लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: October 30, 2021 17:41 IST

Smart TV Under 10000: भारतीय कंपनी Karbonn ने आपला एक स्वस्त Smart TV भारतात लाँच केला आहे. हा स्मार्ट टीव्ही रिलायन्स डिजिटलच्या माध्यमातून विकत घेता येईल.  

Smart TV Under 10000: भारतीय मोबाईल निर्माता कंपनी Karbonn ने आता Smart TV सेगमेंटमध्ये पदार्पण केले आहे. आतापर्यंत स्मार्टफोन आणि फिचर फोनसाठी ओळखली जाणारी ही कंपनी आता स्वस्त स्मार्ट टीव्ही घेऊन आली आहे. कार्बनने दिवाळीच्या आधी एक स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. हा स्मार्ट टीव्ही रिलायन्स डिजिटलच्या माध्यमातून विकत घेता येईल.  

सध्या कार्बनचे पाच टीव्ही मॉडेल्स उपलब्ध आहेत. कंपनी आगामी दोन वर्षात अजून 10 मॉडेल्स जोडणार आहे. Karbonn ने KJW39SKHD, KJW32SKHD आणि KJWY32SKHD हे तीन स्मार्ट एलईडी टीव्ही मॉडेल्स सादर केले आहेत. तर KJW24NSHD आणि KJW32NSHD हे दोन एलईडी मॉडेल्स आहेत. 

कार्बन स्मार्ट टीव्हीचे फीचर्स 

KJW32SKHD स्मार्ट एलईडी टीव्ही बेजल्स-लेस डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. यात बिल्ट-इन अ‍ॅप स्टोर देण्यात आला आहे, त्यामुळे विविध अ‍ॅप वापरता येतील. तसेच अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टचा आस्वाद देखील या टीव्हीवर घेता येईल. स्मार्ट एलईडी टीव्ही मध्ये एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीला मल्टीपल डिवाइस कनेक्ट करता येतील. या टीव्ही मध्ये युजर्सना प्री-इंस्टॉल्ड मुव्ही बॉक्स मिळेल त्यामुळे युजर्सना अनेक मुव्हीज बघता येतील. या स्मार्ट टीव्हीमधील ऑडिओ आणि साउंड इफेक्ट्स घरातच थिएटर सारखा अनुभव देतील, असा दावा कंपनीने केला आहे.  

कार्बन टीव्हीची किंमत 

कार्बन स्मार्ट टीव्हीची किंमत 7,990 रुपये आहे. ही किंमत 24 इंचाच्या मॉडेलची आहे. या सीरिजमधील सर्वात मोठा 39 इंचाचा मॉडेल 16, 990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 32 इंचाच्या स्मार्ट टीव्ही मॉडेलची किंमत 10,990 ठेवण्यात आली आहे. तर 32 इंचाच्या एलईडी मॉडेलची किंमत 9,990 रुपये आहे.  

टॅग्स :karbonn mobileकार्बन मोबाइलtechnologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन