देशातील सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या जिओ-हॉटस्टारच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच जिओ-हॉटस्टार त्यांच्या सर्वच प्लॅनच्या किमतीत मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या वार्षिक ₹१,४९९ असलेल्या प्लॅनची किंमत थेट ₹२,४९९ पर्यंत वाढू शकते, अशी माहिती लीक्स आणि अहवालांमधून समोर आली आहे.
माध्यमांमध्ये लीक झालेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, जिओ-हॉटस्टारने किंमत वाढीची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या आणि प्रस्तावित किमती ३ महिने पॅकसाठी सध्याच्या ₹४९९ ऐवजी ₹७९९ रुपये मोजावे लागू शकतात. तर वर्षाच्या ₹१,४९९ च्या पॅकसाठी तुम्हाला ₹२,४९९ रुपये मोजावे लागू शकतात.
या संभाव्य दरवाढीनंतरही, प्रीमियम प्लॅनचे फायदे मात्र कायम राहण्याची शक्यता आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ४के रिझोल्युशन, डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि एकाच वेळी चार उपकरणांवर जाहिरात-मुक्त कंटेंट पाहण्याची सुविधा मिळते. मात्र, लाइव्ह कंटेंट (उदा. स्पोर्ट्स) जाहिरात-मुक्त नसणार.
इतर प्लॅनवर परिणाम नाही?सध्याच्या माहितीनुसार, जिओ-हॉटस्टारच्या अॅड-सपोर्टेड (Ad-Supported) प्लॅनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. यामुळे मोबाईल प्लॅन : ₹४९९/वर्ष आणि सुपर प्लॅन : ₹८९९/वर्ष (दोन उपकरणांवर) असाच राहणार आहे. केवळ प्रिमिअम कंटेटधारकांसाठी १००० रुपयांचा भुर्दंड सोसण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. अद्याप कंपनीने यावर अधिकृत घोषणा केलेली नाही.
सिने आणि क्रिकेटरसिकांना फटका...
जिओ हॉटस्टारवर आयपीएल, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सिनेमा, मालिका यांचे प्रक्षेपण होते. यामुळे जिओ सिनेमाचा मोठा ग्राहकवर्ग आहे. जवळपास ३० कोटी सबस्क्रायबर आहेत. काही महिन्यांपूर्वीच डिस्ने हॉटस्टारशी जिओने टायअप केले होते. यामुळे त्या अॅपचे नाव बदलून जिओ हॉटस्टार करण्यात आले होते.
Web Summary : Jio-Hotstar may significantly increase premium subscription costs. The ₹1,499 annual plan could jump to ₹2,499. Ad-supported plans are likely unaffected. This impacts movie and cricket fans.
Web Summary : जियो-हॉटस्टार प्रीमियम सब्सक्रिप्शन की कीमतें बढ़ा सकता है। ₹1,499 का वार्षिक प्लान ₹2,499 तक जा सकता है। विज्ञापन-समर्थित प्लान अप्रभावित रहने की संभावना है। इससे मूवी और क्रिकेट के दीवानों पर असर पड़ेगा।