Jio Phone मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर; आता या स्वस्त फोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप वापरणे होईल सुखकर  

By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2021 11:40 AM2021-06-09T11:40:46+5:302021-06-09T11:41:17+5:30

Whatsapp Voice Calling On KaiOS: व्हॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे VoIP टेक्नॉलॉजीवर आधारित व्हाट्सअ‍ॅप व्हॉईस कॉलिंग आता जियोफोन आणि इतर KaiOS डिव्हाइसेसवर उपलब्ध झाली आहे.  

Jio phone and kaios devices gets whatsapp voice calling feature  | Jio Phone मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर; आता या स्वस्त फोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप वापरणे होईल सुखकर  

Jio Phone मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर; आता या स्वस्त फोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप वापरणे होईल सुखकर  

Next

Jio Phone मध्ये 2018 पासून व्हाट्सअ‍ॅप वापरता येत होते परंतु, या फोनमधून व्हाट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंग मात्र करता येत नव्हती. फक्त जियोफोन नव्हे तर KaiOS असलेल्या अनेक स्मार्ट फिचरफोन्समध्ये हे फिचर उपलब्ध नव्हते. परंतु, आता व्हाट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंग फीचर Jio Phone आणि Jio Phone 2 आणि KaiOS वर चालणाऱ्या इतर सर्व फीचर फोनसाठी उपलब्ध झाली आहे.  

हे नवीन फीचर व्हॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे VoIP टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हे फीचर वापरण्यासाठी सक्रिय वाय-फाय किंवा मोबाईल डेटा असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम KaiOS वापरणाऱ्या युजर्सना WhatsApp च्या 2.2110.41 व्हर्जनवर अपडेट करावे लागेल, त्यानंतरच त्यांना हे फिचर उपलब्ध होईल. तसेच चॅटमधील ऑप्शन्समध्ये जाऊन त्या व्यक्तीला कॉल करता येईल. तसेच ज्याप्रकारे नेहमीचे कॉल्स घेता येतात, त्याप्रमाणे व्हाट्सअ‍ॅप कॉल देखील उचलता येतील.  

Jio 5G ची तयारी  

4G नंतर भारतात लवकरच जियो 5G येणार अश्या बातम्या गेले अनेक दिवस येत आहेत. कंपनी 5जी टेक्नॉलॉजीवर काम करत असल्याची माहिती देखील जियोने दिली आहे. यासाठी Jio ने 22 सर्कल्समध्ये स्पेक्ट्रमची खरेदी पण केली आहे. परंतु, हि सेवा कधी लाँच होईल याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.   

Web Title: Jio phone and kaios devices gets whatsapp voice calling feature 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.