शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Jio घेऊन येत आहे सर्वात स्वस्त 5G Phone; जाणून घ्या स्पेक्स आणि किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: February 1, 2022 17:25 IST

Jio Phone 5G Price: Jio Phone 5G कस्टम अँड्रॉइड व्हर्जनसह भारतात लाँच केला जाईल. हा फोन स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा सर्वात स्वस्त 5G चिपसेट आहे.

Reliance Jio नं गेल्या वर्षी भारतात आपला सर्वात स्वस्त 4G फोन सादर केला होता. परंतु त्याआधीपासूनच कंपनीच्या 5G Phone ची चर्चा सुरु होती. आता पुन्हा एकदा Jio Phone 5G च्या बातम्या येऊ लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात फीचर्स समोर आल्यानंतर आता या फोनची किंमत समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असू शकतो.  

Jio Phone 5G Price 

Android Central च्या रिपोर्टनुसार, Jio Phone 5G कस्टम अँड्रॉइड व्हर्जनसह भारतात लाँच केला जाईल. तसेच जियोच्या पहिल्यावहिल्या 5जी फोनची किंमत 9,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान असेल. आता यावर तोपर्यंत विश्वास ठेवता येणार जोपर्यंत हा फोन बाजारात येत नाही. कारण कंपनीच्या JioPhone Next 4G नं आधीच ग्राहकांची निराशा केली आहे.  

Jio Phone 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Jio Phone 5G मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा सर्वात स्वस्त 5G चिपसेट आहे. सोबत एड्रेनो 619 GPU मिळेल. या फोनमध्ये N3, N5, N28, N40 आणि N78 5जी बँड मिळतील. हा फोन 4GB रॅम आणि 32GB एक्सपांडेबल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो.  

हा फोन कस्टम अँड्रॉइडसह येईल, ज्यात Google Play Services आणि Jio Digital Suite अ‍ॅप्स मिळतील. हा ओएस Android 11 वर आधारित असेल. तसेच या फोनमध्ये सर्व अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. जियोच्या 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सलची आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सलची असेल. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. यात 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :JioजिओSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान