शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

JioHotstar सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मिळतंय फ्री, सर्व क्रिकेट सामन्यांचे Free Live Streaming

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:04 IST

नवीन जिओ रिचार्ज हा एक अ‍ॅड-ऑन प्लॅन आहे, जो रेग्युलर प्लॅनसोबत रिचार्ज करावा लागेल. जिओने याला 'Cricket Data Pack' असे नाव दिले आहे.

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन डेटा-ओन्ली रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. खास गोष्ट म्हणजे जिओच्या १९५ रुपयांच्या नवीन डेटा प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी फ्री मिळत आहे. लेटेस्ट डेटा-ओन्ली रिचार्ज प्लॅनसह ग्राहकांना जिओ हॉटस्टारवर असलेल्या संपूर्ण लायब्ररीचा अॅक्सेस मिळतो. 

ग्राहक जिओ हॉटस्टारवर WPL 2025 आणि ICC Champions Trophy 2025 तसेच आगामी IPL 2025 सारख्या क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतील. नवीन जिओ रिचार्ज हा एक अ‍ॅड-ऑन प्लॅन आहे, जो रेग्युलर प्लॅनसोबत रिचार्ज करावा लागेल. जिओने याला 'Cricket Data Pack' असे नाव दिले आहे. २०० रुपयांपेक्षा कमी किमतीतच्या या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी १५ जीबी डेटा मिळतो. 

याशिवाय, अॅड-सपोर्टेड जिओ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन देखील तीन महिन्यांसाठी मिळते. याचा अर्थ, तुम्हाला कंटेंट पाहताना जाहिराती पाहाव्या लागतील. तसेच, या सबस्क्रिप्शनसह ग्राहक आपल्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर ७२० पिक्सेल रिझोल्यूशनवर कंटेंट स्ट्रीम करू शकतात. परंतु ग्राहक एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसवर कंटेंट पाहू शकतील.

जर तुम्ही जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन प्लॅन वेगळा घेतला तर तुम्हाला तीन महिन्यांसाठी १४९ रुपये द्यावे लागतील. पण, आता तुम्ही ४६ रुपये अतिरिक्त देऊन १५ जीबी अतिरिक्त डेटा मिळवू शकता. हे रिचार्ज विशेषतः सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान खूप उपयोगात येईल. जर तुम्ही ४ जी स्मार्टफोन वापरत असाल आणि अनलिमिटेड ५ जी डेटा असलेला प्लॅन हवा असेल तर हा रिचार्ज प्लॅन एक चांगला ऑप्शन आहे.

जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन फ्री ऑफर करणारा हा जिओचा दुसरा रिचार्ज प्लॅन आहे. यापूर्वी, हे सबस्क्रिप्शन जिओच्या ९४९ रुपयांच्या नियमित रिचार्ज प्लॅनमध्ये देखील फ्री मिळत होते. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. या रिचार्जमध्ये दररोज २ जीबी ४जी डेटा मिळतो. याशिवाय, ९० दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, ५जी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.

जर तुमच्या मोबाईलवर सध्या कोणताही बेस प्लॅन नसेल, तर तुम्ही जिओचा ९४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. तसेच, जर तुमच्याकडे आधीच रिचार्ज प्लॅन असेल, तर तुम्ही नवीन १९५ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला १५ जीबी अतिरिक्त डेटासह जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

टॅग्स :Jioजिओtechnologyतंत्रज्ञान