Jio ने आणला नवीन Prepaid Recharge Plan, तीन महिन्यांचे मिळेल Disney+ Hotstar चे मोफत सब्सक्रिप्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 04:33 PM2022-05-05T16:33:46+5:302022-05-05T16:35:11+5:30

Jio : तीन महिन्यात Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शनसह तीन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत.  

Jio launches new Prepaid Recharge Plan, gets three months free Disney + Hotstar subscription | Jio ने आणला नवीन Prepaid Recharge Plan, तीन महिन्यांचे मिळेल Disney+ Hotstar चे मोफत सब्सक्रिप्शन 

Jio ने आणला नवीन Prepaid Recharge Plan, तीन महिन्यांचे मिळेल Disney+ Hotstar चे मोफत सब्सक्रिप्शन 

googlenewsNext

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने (Reliance Jio) नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले असून चांगल्या ऑफर्स आपल्या ग्राहकांना दिल्या आहेत. दरम्यान, Reliance Jio ने  Disney+ Hotstar सोबत आपली भागिदारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, तीन महिन्यात Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शनसह तीन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत.  

१. रिलायन्स जिओ ३३३ रुपयांचा प्रीपेड प्लॅन 
रिलायन्स जिओच्या ३३३ रुपयांचा प्रीपेड प्लॅनच्या अंतर्गत १.५ जीबी डेटासह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि २८ दिवसांसाठी १०० एसएमएस मिळतील.Disney+ Hotstar Mobile चे तीन महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन सुद्धा असेल. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध्य आहे. 

२. रिलायन्स जिओ ५८३ रुपयांचा प्रीपेड प्लॅन 
रिलायन्स जिओचा ५८३ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सला ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच, १.५ जीबी डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, १०० एसएमएस आणि Disney+ Hotstar Mobile चे तीन महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जाईल. 

३. रिलायन्स जिओ ७८३ रुपयांचा प्रीपेड प्लॅन 
रिलायन्स जिओच्या ७८३ रुपयांच्या प्लॅनमध्ये सुद्धा १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, १०० एसएमएस आणि  Disney+ Hotstar Mobile चे तीन महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जाईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांपर्यंत आहे. 

दरम्यान, या तिन्ही प्लॅनमध्ये एकसारखी ऑफर आहे. मात्र, यामध्ये व्हॅलिडिटीमध्ये फरक आहे. नवीन युजर्सकडून प्राइम मेंबरशिपसाठी १०० रुपयांचे शुल्क आकारले जाईल. तसेच, नवीन प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी ९० दिवसांपेक्षा कमी आहे. यासाठी युजर्सला तीन महिन्यासाठी Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शनचा लाभ घेण्यासाठी वेळेवर रिचार्ज करावा लागेल. तिन्ही नवीन जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioCloud आणि Jio अॅप्ससाठी मोफत अॅक्सेस सुद्धा मिळेल. तसेच, एकदा रिचार्ज केल्यानंतर युजर्संना आपल्या त्याच जिओ मोबाईल नंबरसोबत Disney+ Hotstar अॅपमध्ये साइन इन करावे लागेल. 

Web Title: Jio launches new Prepaid Recharge Plan, gets three months free Disney + Hotstar subscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.