शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day offer : जिओच्या 'या' नवीन प्लॅनवर बंपर ऑफर, अमर्यादित कॉलिंगसह मिळतील ५८०० रुपयांच्या भेटवस्तू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 15:08 IST

Independence Day offer : जिओने २९९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्‍लॅन ऑफर करत आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ भारतातील एक प्रसिद्ध टेलिकॉम ऑपरेटर्स कंपनी आहे. जिओकडून युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी नवनवीन बदल करण्यात येतो. यावेळी देखील कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन स्वातंत्र्य दिन ऑफर आणली आहे. दरम्यान, जिओने २९९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्‍लॅन ऑफर करत आहे. यामध्ये अनेक अतिरिक्त फायद्यांसह अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि आपल्या सेवांपर्यंत अ‍ॅक्सेस देत आहे.

जिओचा २९९९ रुपयांचा स्वातंत्र्य दिन ऑफर प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड डेटा आणि दररोज १०० एसएमएसच्या फायद्यांसह येतो. यासोबतच या प्लॅनमध्ये JioCloud, JioTV आणि JioCinemna चा एक्सेस सुद्धा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळतो. तसेच, स्वातंत्र्य दिनाच्या ऑफर अंतर्गत कंपनी स्विगी, यात्रा, अजिओ, नेटमेड्स आणि रिलायन्स डिजिटल वरून ५८०० रुपये सूट सारखे अनेक लाभ देत आहे. 

Swiggy: हा प्लॅन २४९ रुपये किंवा त्याहून अधिकच्या ऑर्डर मूल्यावर १०० रुपये सूट देतो.Yatra: युजर्स फ्लाइट बुकिंगवर १५०० रुपयांपर्यंत आणि देशांतर्गत हॉटेल बुकिंगवर ४००० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. येथे कोणतेही किमान बुकिंग मूल्य नाही.Ajio:९९९ रुपयांच्या ऑर्डरवर फ्लॅट २०० रुपयांची सूट दिली जाईल.Netmeds: ९९९ रुपये+NNM Supercash च्या ऑर्डरवर २० टक्के सूट मिळेल.Reliance Digital : निवडक ऑडिओ अॅक्सेसरीजवर फ्लॅट १० टक्के सूट आणि निवडक घरगुती उपकरणांवर फ्लॅट १० टक्के सूट मिळेल.

कसे करावे रिचार्ज?२९९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन रिचार्ज करण्यासाठी तुम्ही MyJio अॅप किंवा Jio वेबसाइट ओपन करू शकता . त्यानंतर, रिचार्ज ऑप्शनवर जा आणि २९९९ रुपयांचा प्लॅन निवडा. त्यावर स्वातंत्र्य दिनाचा ऑफर टॅग असल्याची खात्री करा. एकदा निवडल्यानंतर, पेमेंट ऑप्शनसह पुढे जा आणि पेमेंट पूर्ण करा. आता तुम्ही MyJio अॅपद्वारे सर्व फायद्यांचा आनंद घेऊ शकता.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल