शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

Jio Fiber चे धमाकेदार प्लॅन्स झाले लाँच; 4K Set-top Box मिळेल मोफत  

By सिद्धेश जाधव | Updated: June 16, 2021 15:10 IST

Jio Fiber new plans: 399 रुपये प्रतिमाहपासून सुरु होणाऱ्या नवीन प्लॅन्सची घोषणा जियो फायबरने केली आहे, हे सर्व प्लॅन्स 17 जूनपासून लागू होतील. 

24 जूनला Reliance AGM होणार आहे, या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक घोषणा केल्या जातील. तत्पूर्वी कंपनीने जियो फायबर युजर्ससाठी अनेक नवीन पोस्टपेड प्लॅन आणले आहेत. या प्लॅन्सची किंमत 399 रुपये प्रतिमाहपासून सुरु होत आहे. हे सर्व प्लॅन्स 17 जूनपासून लागू होतील. (Jio anounced new plans for Jio Fiber users)

नवीन युजर्सना या प्लॅनसह राउटर मोफत मिळेल, अशी कंपनीने घोषणा केली आहे. तसेच, कोणतीही इंस्टॉलेशन फी द्यावी लागणार नाही, त्यामुळे ग्राहकांचे 1500 रुपये वाचतील. परंतु, फ्री राउटर आणि इंस्टॉलेशन मिळवण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 6 महीने वैधता असलेला प्लॅन घ्यावा लागेल.  

जियो फायबरचे प्लॅन  

रिलायन्स जियोने सादर केलेल्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30एमबी, 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100एमबी, 999 रुपयांचा प्लॅनमध्ये 150एमबी आणि 1499रुपयांच्या प्लॅनमध्ये 300एमबी अपलोड स्पीड मिळेल. विशेष म्हणजे या प्लॅन्समधील अपलोड आणि डाउनलोड स्पीड एकसारखा असेल. 1जीबीपीएस स्पीड असलेले प्लॅन देखील जियो फायबरवर उपलब्ध आहे. 

रिलायन्स जियोच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड जियोफायबर कनेक्शन सोबत ग्राहकांना ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. अमेझॉन प्राइम, डिजनी हॉटस्टार, सोनी लिव, झी 5, वूट सिलेक्ट, सन नेक्स्ट इत्यादी 14 प्रसिद्ध ओटीटी अ‍ॅप्स जियो फायबरसोबत मिळतील. तर, 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्ससह 15 ओटीटी अ‍ॅप्सचा समावेश असेल. तसेच, या प्लॅनमध्ये 1000 रुपयांचे सिस्योरिटी डिपाजिट घेऊन ग्राहकांना एक 4K सेटटॉप बॉक्स मोफत देण्यात येईल.  

टॅग्स :Jioजिओtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेट