शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

'या' ब्रॉडबँड प्लॅनसमोर Jio-Airtel देखील फेल; 200Mbps स्पीडसह मिळतो अनलिमीटेड डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:11 IST

आजच्या काळात प्रत्येकजण हायस्पीड आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहे. मार्केटमध्ये असलेल्या टेलीकॉम कंपन्या चांगले प्लॅन्स ऑफर करतात. ही कंपनी Jio-Airtel सारख्या मार्केटवर वर्चस्व गाजवत नाही, पण त्यांचे प्लान्स जोरदार आहेत.

आजच्या काळात प्रत्येकजण हायस्पीड आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहे. मार्केटमध्ये असलेल्या टेलीकॉम कंपन्या चांगले प्लॅन्स ऑफर करतात. पण, आज आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel सोबतच Netplus च्या 999 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. ही कंपनी Jio-Airtel सारख्या मार्केटवर वर्चस्व गाजवत नाही, पण त्यांचे प्लान्स जोरदार आहेत. 

नेटप्लस- 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनNetplus सध्या उत्तरेकडील सात भारतीय राज्यांमध्ये आपली सेवा देत आहे. Netplus 1 Gbps पर्यंतच्या स्पीडने इंटरनेट कनेक्टिव्हिटी देते. याशिवाय या प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. Netplus 999 रुपये प्रति महिन्याच्या दराने 200 Mbps इंटरनेट स्पीड देते. या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित डेटाचा लाभ मिळतो. तसेच, Amazon प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन, Zee5 प्रीमियम, Voot Select आणि EROS नाऊचे बंडल पॅक घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 

जिओचा 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनभारतातील सर्वात विश्वासार्ह सेवा प्रदात्यांपैकी एक, JioFiber 30 दिवसांच्या वैधतेसाठी 999 रुपयांच्या किमतीत 150 Mbps इंटरनेट स्पीड डेटा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची ​​FUP मर्यादा 3300Gb किंवा 3.3TB आहे. वापरकर्त्यांना या प्लॅनसह 150 Mbps अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळते. हा प्लॅन वेबसाइटवर एक लोकप्रिय प्लॅन म्हणून सूचीबद्ध आहे. यात Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Eros Nowसह 15 OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो.

एअरटेलचा 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनब्रॉडबँड सेवा प्रदान करण्याच्या बाबतीत एअरटेल ही बाजारपेठेतील सर्वात प्रमुख कंपनी आहे. एअरटेल त्याच्या Xstream फायबर कनेक्‍शनद्वारे OTT ऍक्‍सेससह 'एंटरटेनमेंट' पॅकपासून सुरू होणारे प्लॅन्स ऑफर करते. हे प्लॅन्स 999 रुपयांच्या मासिक किमतीत 200 Mbps इंटरनेट स्पीड देते. यात 3.3TB किंवा 3300GB FUP डेटा मिळतो. एअरटेल त्याच्या ब्रॉडबँड प्लॅनसह 'एअरटेल थँक्स बेनिफिट्स' देखील ऑफर करते, ज्यामध्ये विंक म्युझिकसह Amazon Prime आणि Disney+ Hotstar OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. हा एअरटेलचा सर्वाधिक विकला जाणारा प्लॅन आहे.

 

 

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलIdeaआयडियाVodafoneव्होडाफोन