शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Jio, Airtel 5G Speed Tested on Ookla: ओक्लाने पोलखोलच केली! एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड जास्त...ही घ्या आकडेवारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:15 IST

ओक्ला या इंटरनेट स्पीड तपासता येणाऱ्या अॅपच्या कंपनीने ५जीचा इंटरनेट स्पीड किती ते समोर आणले आहे.

देशात ५ जी सेवा लाँच झाली आहे. एअरटेल आणि जिओने काही शहरांमध्ये ती सुरु केली आहे. आता या दोन कंपन्यांमध्ये वेगाची स्पर्धा लागली आहे. कोणाचा वेग जास्त आहे, याचबरोबर काही दिवसांत रिचार्जवरून देखील स्पर्धा रंगणार आहे. यात कोणाचा फायदा ते येणारा काळच सांगेल, परंतू सध्या वेगाच्या स्पर्धेत कोण पुढे आहे हे Ookla ने सांगून टाकले आहे. 

Airtel Vs Jio 5G: एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड, कव्हरेज सुपरफास्ट असणार; कोणाचे स्वस्त रिचार्ज

ओक्ला या इंटरनेट स्पीड तपासता येणाऱ्या अॅपच्या कंपनीने ५जीचा इंटरनेट स्पीड किती ते समोर आणले आहे. ओक्लानुसार जियोचा टॉप स्पीड 600Mbps पर्यंत असल्याचे समोर आले आहे. या रिपोर्टमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीच्या शहरांचा इंटरनेट स्पीडचा सर्व्हे करण्यात आला आहे. Jio True 5G आणि Airtel 5G Plus मध्ये जिओने बाजी मारली आहे. यानुसार दिल्लीत एअरटेलचा 5G स्पीड 197.98Mbps मिळत आहे. म्हणजे जवळपास 200Mbps. तर जिओ ५जीचा स्पीड त्याच्या तिप्पट म्हणजेच 598.58 Mbps एवढा प्रचंड मिळत आहे. कोलकातामध्ये एअरटेलचा स्पीड 33.83 Mbps एवढा कमी होता, तर जिओ ५जी चा स्पीड 482.02 Mbps एवढा होता. या दोन शहरांत जिओने बाजी मारली आहे. परंतू हे देखील लक्षात घ्यायला हवे की, एअरटेलने सर्वांसाठी ५जी सेवा उपलब्ध केली आहे, तर जिओने लिमिटेड युजरसाठीच ५जी नेटवर्कची टेस्टिंग सुरु केली आहे. 

मुंबईत एअरटेल ५जी युजर्सना 271.07 Mbps पर्यंतचा वेग मिळाला आहे. तर जिओ युजर्सना 515.38 Mbps चा वेग मिळाला आहे. वाराणसीत मात्र दोन्ही ऑपरेटर्समधील वेगाचे अंतर कमीच नाही तर जिओला एअरटेलने मागे टाकले आहे. एअरटेलने 516.57 Mbps पर्यंतचा स्पीड नोंदविला आहे. तर जिओने 485.22 Mbps चा स्पीड दिला आहे. 

ओक्लाच्या ग्राहक सर्व्हेनुसार ८९ टक्के भारतीय स्मार्टफोन ग्राहक ५जी नेटवर्कवर अपग्रेड होण्यास इच्छुक आहेत. गेल्या दोन वर्षांत अनेक ग्राहकांनी 5G रेडी स्मार्टफोन खरेदी केले आहेत. या डिव्हाईसवर सध्या जिओचे ग्राहक सर्वाधिक आहेत. सर्वाधिक ५जी फोन हे हैदराबादमध्ये वापरले जात आहेत. यातही आयफोन युजर्स जास्त आहेत. तिथे ५१ टक्के ग्राहकांकडे ५जी फोन आहेत.  

टॅग्स :AirtelएअरटेलJioजिओ