शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
3
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
4
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
5
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
6
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
7
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
8
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
9
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
10
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
11
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
12
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
13
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
14
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
15
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
16
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
17
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
18
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
19
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
20
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

योग्य उमेदवार मिळेना; भारतात सायबर सिक्योरिटी क्षेत्रात 40,000 नोकऱ्या, लाखोंमध्ये पगार...

By ओमकार संकपाळ | Published: June 21, 2023 9:01 PM

IT Jobs in India: डिजिटल इंडियाला गती मिळाल्यानंतर आता देशात सायबर सुरक्षाही महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत.

IT Jobs in India: डिजिटल इंडियाला गती मिळाल्यानंतर आता देशात सायबर सुरक्षाही महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्या नोकऱ्याही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. मे 2023 पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, देशात सायबर सिक्युरिटीमध्ये सुमारे 40,000 नोकऱ्या आहेत आणि या पदांसाठीचा पगारही प्रचंड आहे.

टीमलीज डिजिटलच्या अहवालानुसार, देशात सायबर सिक्युरिटी स्किल्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र या या क्षेत्रात योग्य उमेदवार मिळणे अवघड झाले आहे. कुशल उमेदवार नसल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागा रिका्या आहेत. कामाच्या तुलनेत फक्त 30 टक्के कुशल उमेदवार आहेत. 

80 लाखांपर्यंत पॅकेज मिळवासायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्सना मार्केटमध्ये उत्कृष्ट सॅलरी पॅकेजही मिळत आहे. टीमलीजच्याच अहवालात असे म्हटले आहे की, प्रेसिडेंट-इंफॉर्मेशन सिक्योरिटी किंवा चीफ इंफॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर स्तरावरील लोकांना 50 लाख ते 80 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर केले जाते. तर, 12 वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना 30 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. विशेष म्हणजे, या क्षेत्रात फ्रेशर्सना 6 ते 10 लाख रुपये पगार दिला जातो. 

आणखी वाढ अपेक्षित सायबर सुरक्षा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. याचे कारण म्हणजे सतत वाढत जाणारे सायबर हल्ले. 2023 च्या पहिल्या तिमाहीत भारतीय संस्थांना दर आठवड्याला 2000 हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 18 टक्के अधिक आहे. अशा स्थितीत सायबर सिक्युरिटी मार्केट आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. 2027 पर्यंत ही बाजारपेठ दरवर्षी 8.05 टक्के दराने $3.5 अब्ज पर्यंत वाढू शकते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमInformation & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालयITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी