शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

ISRO Satellite Internet Launch: बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 18:12 IST

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आकाशात स्टारलिंकचे सॅटेलाईट एका ओळीने दिसले होते.

भारतात सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिसबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक ही सेवा सुरु करेल असे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आकाशात स्टारलिंकचे सॅटेलाईट एका ओळीने दिसले होते. परंतू, या स्टारलिंकच्या आधीच देशाची अंतराळ संस्था ISRO ने बाजी मारली आहे. 

सॅटेलाईट इंटरनेट सेवा देण्यासाठी Hughes Communications India ने इस्त्रोसोबत हात मिळविला होता. आता कंपनीने हाई-थ्रोपुट सॅटेलाइट (HTS) ब्रॉडबँड सर्व्हिस कमर्शिअली लाँच केली आहे. याला इस्त्रोचा मोठा बॅकअप आहे. यामुळे देशाला स्वदेशी अशी सॅटेलाईट इंटरनेट सेवा मिळाली आहे. स्टारलिंकने भारतातील आपले काम थांबविले आहे. मोदी सरकारने मस्क यांच्या या कंपनीला आवश्यक लायसन न घेतल्यामुळे बंदी घातली आहे. आता इस्त्रोच्या माध्यमातून हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हिस दिली जाणार आहे. याद्वारे सुरुवातीला उद्योग आणि सरकारी कार्यालयांना जोडले जाणार आहे. 

लोकांचे जीवनमान सुधारता येईल यासाठी इस्रोमध्ये आम्ही खाजगी क्षेत्रासोबत काम करण्याचे मार्ग शोधत आहोत, असे इस्रोच्या अंतराळ विभागाचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ म्हणाले. इस्त्रोच्या सॅटेलाईटद्वारे हे इंटरनेट पुरविले जाणार आहे. यामुळे एचसीआय चांगल्या वेगाने सातत्य राखून इंटरनेट सेवा सुरु ठेवेल असे म्हटले जात आहे. यामुळे देशातील कनेक्टिव्हिटीचा अनुभव आणखी सुधारेल. भारताच्या डिजिटल क्रांतीला गती देखील मिळणार आहे. 

HCI ची सॅटेलाईट ब्रॉडबँड २ लाखांहून अधिक उद्योग आणि सरकारी कार्यालयांना दिले जाणार आहे. याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारांच्या प्रकल्पांनाही ही सेवा दिली जाणार आहे. यासाठी कंपनी इस्त्रोचे ७५ हून अधिक सॅटेलाईट वापरत आहे. इस्रोच्या केयू-बँड क्षमतेच्या GSAT-11 आणि GSAT-29 उपग्रहांपासून हाय-स्पीड इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. यामुळे दुर्गम भागातही इंटरनेटची सेवा मिळू शकणार आहे. 

टॅग्स :isroइस्रोInternetइंटरनेटelon muskएलन रीव्ह मस्क