शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

फक्त 1049 रुपयांमध्ये तुमचा होईल वेगवान 5G Phone, फोनमध्ये 8GB रॅम आणि 5000mAh ची बॅटरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:35 IST

iQOO Z6 स्मार्टफोनची एंट्री Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह झाली आहे.

iQOO Z6 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लाँच झाला होता. हा बजेट सेगमेंटमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. त्यामुळे तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन बजेटमध्ये हवा असेल तर तुम्ही iQOO Z6 5G चा विचार करू शकता. आधीच या स्मार्टफोनची किंमत कमी आहे, त्यात अ‍ॅमेझॉनवरील डिस्काउंटमुळे अजून स्वस्तात 8 जीबी रॅम असलेला हा फोन विकत घेता येईल.  

iQOO Z6 5G ऑफर  

iQOO Z6 5G स्मार्टफोनवर 2 हजार रुपयांपर्यंतचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर करावा लागेल. म्हणजे 15,499 रुपयांचा बेस व्हेरिएंट 13,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. किंवा तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 14,450 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. योग्य स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास फोनचा बेस व्हेरिएंट फक्त 1049 रुपयांमध्ये तुमच्या घरी येईल.  

iQOO Z6 5G चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात Panda Glass ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12  बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि Adreno 619 GPU मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.  

iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. यात पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. iQOO Z6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP ची पोर्टेट लेन्स दिला मिळते. फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर आहे.  

टॅग्स :VivoविवोMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन