शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

अँड्रॉइडपेक्षा स्वस्त 5G iPhone! नव्या अ‍ॅप्पल फोनवर 18 हजारांची सवलत, जाणून घ्या ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:10 IST

Apple iPhone SE (2022) काही दिवसांपूर्वी लाँच झाला आहे. परंतु आता हा फोन डिस्काउंटसह उपलब्ध झाल्यामुळे याची किंमत अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या तुलनेत कमी झाली आहे.  

Apple नं काही दिवसांपूर्वी iPhone SE (2022) लाँच केला होता. हा सर्वात स्वस्त 5G iPhone अँड्रॉइड युजर्सना आयफोनकडे वळवण्याच्या उद्देशानं सादर करण्यात आला आहे. सध्या अ‍ॅमेझॉनवर मिळत असलेला डिस्काउंट हा उद्देश साध्य करेल असं दिसतं आहे. या ऑफर्समुळे तुम्ही iPhone SE (2022) 43,900 रुपयांच्या ऐवजी फक्त फक्त 25,700 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

अशी आहे ऑफर  

iPhone SE (2022) च्या 64GB मॉडेलची किंमत 43,900 रुपये आहे. हा फोन आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, एसबीआयच्या क्रेडिट कार्ड किंवा कोटक बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून विकत घेतल्यास 2000 रुपयांची सूट मिळेल. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही 16,200 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामुळे iPhone SE (2022) ची प्रभावी किंमत 25,700 रुपये होते.  

Apple iPhone SE (2022) चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone SE (2022) ची डिजाईन जुन्या iPhone 8 सारखी आहे. या आयफोनच्या बॅक आणि फ्रंटला देण्यात आलेली ग्लास कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात मजबूत ग्लास आहे. सिक्योरिटीसाठी यात Touch ID देण्यात आली आहे. तसेच यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. हा डिवाइस Red, Black आणि White कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येईल.  

Apple iPhone SE (2022) मध्ये गेल्यावर्षी आलेल्या फ्लॅगशिप iPhone 13 सीरिजच्या A15 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या पावरफुल चिपसेटसह कंपनीनं 5G कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे. हा फोन iOS 15 वर चालेल, तसेच यात फोकस मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 12MP चा सिंगल कॅमेरा आहे, जो Deep Fusion, Smart HDR 4 आणि फोटो स्टाईलला सपोर्ट करतो. यात चांगली व्हिडीओ रेकॉर्डिंग क्वॉलिटी मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपलamazonअ‍ॅमेझॉन