Apple ने मंगळवारी सर्वात शक्तिशाली iPhone 17 मॉडेल लाँच केले आहेत. यात iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश आहे. कंपनीने अपग्रेडेड डिझाइनशिवाय आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी दिली आहे. याशिवाय, कंपनी विशेष कॅमेरा अपग्रेड देत आहे. तसेच, युजर्सना, Apple Intelligence सह, विद्यमान डिव्हाइसेसच्या तुलनेत, अधिक चांगले रिअल-लाइफ युजेस मिळतील. तर जाणून घेऊयात या नवीन Pro मॉडेल्सच्या फीचर्ससंदर्भात.
अॅपलने iPhone 17 Pro मध्ये 6.3 इंचांचा डिस्प्ले तर iPhone 17 Pro Max ला 6.9 इंचांचा डिस्प्ले दिला आहे. हा 120Hz Pro Motion डिस्प्ले आहे. तसेच ऑलवेज-ऑन-डिस्प्ले (AOD) सपोर्टसह येतो. या अँटी रिफ्लेक्टिव्ह डिस्प्लेशिवाय, यात एल्युमिनियम फिनिशचे डिझाइन देण्यात आले आहे. या मोबाईलची रुंदी 8.7mm एवढी आहे. पॉवरफुल परफॉर्मंन्ससाठी कंपनीने A19 Pro चिप सेटही दिला आहे. तसेच 12GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे.
वेपर चेंबर कूलिंग सिस्टम -कंपनीने प्रो मॉडल्समध्ये पहिल्यांदाच वेपर चेंबर कूलिंग सिस्टम दिले आहे. मोबाईलला 48MP फ्यूजन कॅमेरा, 48MP अल्ट्रा व्हाइड सेंसर आणि 48MP टेलीफोटो सेंसर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो 8x पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 8K व्हिडिओ रिकॉर्डिंगशिवाय, डुअल व्हिडिओ रिकॉर्डिंग ऑफर करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी सेंटर स्टेज 24MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
वाचा - Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
iPhone ची आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी - बॅटरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, iPhone 17 Pro मध्ये 3700mAh बॅटरी आणि 17 Pro Max मध्ये जवळपास 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याला रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्टदेखील देण्यात आला आहे. तसेच Max मॉडेलला आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हे eSIM ओनली डिव्हाइस आहे.
वाचा - iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
iPhone 17 Pro आणि 17 Pro Max ची किंमत -भारतीय बाजारात iPhone 17 Pro ची किंमत 134,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर iPhone 17 Pro Max ची किंमत 149,900 रुपयांपासून सुरू होते. हे फोन सिल्व्हर, डीप ब्लू आणि कॉस्मिक ऑरेंजमध्ये उपलब्ध असतील. यासाठी प्री-ऑर्डरही सुरू झाली आहे. डिलिव्हरी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल.