शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बॅक पॅनलवर रोलेक्स, १८ कॅरेट गोल्ड; iPhone 14 स्पेशल एडिशन लाँच, किंमत इतकी की घरही घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 12:13 IST

या आयफोनच्या बॅक पॅनलवर रोलेक्स घड्याळ देखील आहे.

तब्बल एक कोटी रुपयांचा आयफोन लाँच झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या आयफोनच्या बॅक पॅनलवर रोलेक्स घड्याळ देखील आहे. हा कोणताही साधासुधा आयफोन नाही, जो तुम्ही एखाद्या ॲपलच्या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकाल. लक्झरी ब्रँड Caviar ने Apple च्या नव्या iPhone 14 Pro चे लिमिटेड एडिशन कस्टमाईझ केले आहे. आयफोनचे हे लक्झरी व्हर्जन खास हिरे आणि मेटल्सबासून बनवण्यात आले आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे याच्या मागील पॅनलमध्ये रोलेक्स घड्याळ देखील आहे. याशिवाय रेस कारच्या कंट्रोल पॅनलसारखे डेकोरेटिव्ह सेन्सरही यामध्ये देण्यात आले आहेत. या आयफोनची किंमत 133,670 डॉलर्स (सुमारे 1.1 कोटी रुपये) आहे.

फोनच्या मागील बाजूला Rolex Daytona हे घड्याळ लावण्यात आले आहे. डेटोना कॅविअरच्या अपडेटेड कलेक्शन Grand Complications चा हिस्सा आहे. डेटोना रेसिंगसाठी डेडिकेटेड आहे आणि याला व्यावसायिक ड्रायव्हर्ससाठी डिझाईन करण्यात आल्याची माहिती कंपनीनं आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

आयफोन 14 प्रो ची केस मल्टी बॉडी टायटॅनियमनं बनली आहे. याशिवाय त्यावर पीव्हीडी कोटींगही करण्यात आलंय. याचा वापर रोलेक्स ब्लॅक डायल, केसेस आणि ब्रेसलेट तयार करण्यासाठी करते. लिमिटेड एडिशन आयफोन 12 प्रो च्या बॅक पॅनलवर सोन्यानं तयार केलेल्या स्पीडोमीटर आणि स्विचचा वापर करण्यात आला आहे. या फोनचा रिअर लूक जबरदस्त आहे.

गेल्या वर्षी आला होता iPhone 13गेल्या वर्षी या लक्झरी ब्रँडने iPhone 13 आणि iPhone 13 Pro Max स्पेशल एडिशन लाँच केले होते. ब्रँडने आपल्या लाईनअपला "Parade of the Planets” असं नाव दिलं आहे. प्रोटोटाईप ब्लॅक टायटॅनिअमनं कव्हर करण्यात आले होते. हे रस्ट प्रुफ मटेरिअल जास्त करून स्पेस इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येतं.

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन