शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अँड्रॉइडमधील ‘या’ फीचर्ससह येऊ शकतो आगामी आयफोन; iPhone 14 चे संभाव्य स्पेसिफिकेशन आणि डिजाईन लीक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 16:56 IST

iPhone 14 leaks: iPhone 13 सीरिज नुकतीच सादर करण्यात आली आहे. परंतु iPhone 14 सीरिजचे लीक येण्यास त्याआधीपासूनच सुरुवात झाली होती.  

अ‍ॅप्पलने 14 सप्टेंबरला नवीन आयफोन 13 लाइनअपची घोषणा केली आहे. आता हे फोन्स खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. कंपनीने आता पुढील वर्षीच्या आयफोन्सवर काम करायला सुरुवात केली आहे, असे दिसत आहे. कारण सीरिज 13 च्या लाँचच्या आधीपासून iPhone 14 चे लीक येण्यास सुरुवात झाली होती. आता अ‍ॅप्पल अनॅलिस्ट मिंग-ची कुओ यांनी आगामी आयफोन्ससंबंधित माहिती लीक केली आहे. समोर आलेल्या लिक्समधून iPhone 14 मध्ये अँड्रॉइडमध्ये गेले कित्येक वर्ष उपलब्ध असलेले फीचर्स आणि स्पेक्स दिले जाऊ शकतात, असे वाटत आहे.  

iPhone 14 Pro, Pro Max डिजाईन  

कुओ यांच्या मते, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये नॉचच्या एक पंच-होल दिला जाईल. विशेष म्हणजे सध्या अँड्रॉइड डिवाइसेजमध्ये दिसणारी ही डिजाईन फक्त आगामी प्रो मॉडेल्समध्ये मिळेल. याआधी Jon Prosser यांनी देखील iPhone 14 Pro मध्ये नॉचच्या ऐवजी पंच-होल डिस्प्ले मिळेल हे सांगितले होते. नवीन सीरीजची डिजाईन मोठ्याप्रमाणावर iPhone 4 सारखी आहे. डिवाइसमध्ये शार्प कार्नर आणि गोल वॉल्यूम बटण मिळतील. तसेच आगामी आयफोन लाइनअपमध्ये कॅमेरा सेटअप बॉडीच्या आत असेल त्यामुळे डिवाइसची जाडी वाढून मोठी बॅटरी देखील दिली जाऊ शकते.  

iPhone 14 कॅमेरा  

iPhone 14 Pro मधील सर्वात मोठा बदल म्हणजे या फोनमध्ये मिळणार कॅमेरा असेल. कुओ यांनी दिलेल्या माहितीनुसार या फोनच्या बॅक पॅनलवर 48MP चा वाईड कॅमेरा मिळेल. आतापर्यंत आयफोनमध्ये 12MP पेक्षा जास्त रिजोल्यूशनचा कॅमेरा देण्यात आलेला नाही. तसेच पुढील वर्षी लाँच होणाऱ्या आयफोन सीरीजमध्ये अंडर-डिस्प्ले Touch ID मिळेल. एकीकडे 48MP कॅमेरा बजेट सेगमेंटमधील अँड्रॉइड फोन्समध्ये दिसतो तर मिडरेंज अँड्रॉइड इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येऊ लागले आहेत.  

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड