हल्ली अनेक स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोममध्ये फिंगरप्रिन्ट सेन्सर ऐवजी केवळ फेस आयडी सेन्सर देण्यास सुरूवात केली आहे. सध्या कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये मास्क परिधान करणं अनिवार्य केलं आहे. अशा परिस्थितीत मास्क परिधान करून फेस आयडीद्वारे आपला फोन अनलॉक करणं अशक्य होत होतं. तर दुसरीकडे मास्क काढून फोन अनलॉक करायचा किंना पासवर्डच्या सहाय्यानं फोन अनलॉक करायचा असे दोन ऑप्शन युझर्ससमोर होते. परंतु आता अमेरिकन टेक कंपनी Apple नं आपल्या नव्या iOS 14.5 च्या बीटा व्हर्जनमध्ये ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. हे व्हर्जन डाऊनलोड केल्यानंतर जरी युझरनं मास्क परिधान केला असेल तरी त्याला आपला फोन अनलॉक करता येणार आहे. Apple Watch हातात असताना जर युझरनं मास्क परिधान केलं असेल तर तो आपला iPhone अनलॉक करू शकतो. याचाच अर्थ जर तुम्हाला मास्क परिधान केलेलं असताना फोन अनलॉक करण्यासाठी Apple Watch ची आवश्यकता आहे. असं असेल तरच युझरला फेस आयडी फीचरसह फोन अनलॉक करता येईल. iPhone युझर्सना आपलं Apple Watch हे watch os 7.4 वर अपडेट करावं लागेल. Apple Watch चं आपल्या मास्कसह फोन अनलॉक करण्यासाठी मदत करतो असं Apple कडून सांगण्यात आलं. यासाठी Apple Watch तुमच्या हातात असलं पाहिजे आणि यासोबतच ते अनलॉक्ड आणि पासवर्ड प्रोटेक्डेटही असणं अनिवार्य आहे. एका ब्लॉगरनं यासंदर्भातील एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
मास्क घालूनही फोन होणार अनलॉक, 'या' कंपनीनं केला फेसआयडीमध्ये मोठा बदल
By जयदीप दाभोळकर | Updated: February 2, 2021 15:32 IST
मास्क परिधान करून अनलॉक, ड्युअल 5G सपोर्ट आणि अनेक फीचर्सचा करण्यात आलाय समावेश
मास्क घालूनही फोन होणार अनलॉक, 'या' कंपनीनं केला फेसआयडीमध्ये मोठा बदल
ठळक मुद्दे ड्युअल 5G सपोर्टही मिळणारसध्या बीटा व्हर्जनवर सुरू आहे काम