शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही डिव्हाईसशिवाय ऐकू येणार गाणी, पाहा कसा आहे जबरदस्त टेक्नॉलॉजी असलेला Invisible Headphone 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 15:57 IST

कोणत्याही प्रकारे कानाला हेडफोन्स न लावता तुम्हाला घेता येईल आहे गाण्यांचा आनंद.

आपण अनेकदा मोबाइलवर गाणी ऐकत असतो. जसं तंत्रज्ञान बदललं तसं ईअरफोन्स, ईअरबड्स अशा गोष्टी आपल्या परिचयाच्या झाल्या. परंतु जर कोणत्याही ईअर बड्स, हेडफोन किंवा नेकबँडशिवाय तुम्हाला गाणं ऐकू आलं तर? आणि इतकंच नाही, तर तुमच्यासोबत असलेल्या व्यक्तीला ऐकू न येता त्याचा आनंद तुम्हीच घेऊ शकत असाल तर, तुम्हाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. 

एक कंपनी असाच एक अदृश्य हेडफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. तो कानाला न लावताच तुन्हाला गाण्यांचा आनंदही घेता येणार आहे. या हेडफोनमधून येणारा आवाज कोणत्याही वायर कनेक्शनशिवाय थेट तुमच्या कानात ऐकू येईल. दिसायला हे डिव्हाइस स्पीकरसारखे असले तरी काम मात्र हेडफोनचे करते. Noveto N1 हे नेकबँडप्रमाणे नसून तुमच्या डेस्कवर छोट्या साउंडबारसारखा राहिल. मात्र तो आवाज थेट तुमच्या कानामध्ये ट्रान्समिट करेल. 

हे डिव्हाइस कसे काम करते?हे डिव्हाइस बनवणाऱ्या कंपनीने सर्वप्रथम कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये या टेक्नॉलॉजीची झलक दाखवली होती. Noveto N1 हा प्रोडक्ट इनव्हिसिजिबल हेडफोनप्रमाणे काम करतो. हे डिव्हाईस ईयरफोनला कनेक्ट व्हायच्या ऐवजी स्मार्ट बिमिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आवाज थेट तुमच्या कानात पोहोचवतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं अल्ट्रासॉनिक किरणं युझरच्या कानापर्यंत पाठवली जातात. विशेष म्हणजे याचा आवाज फक्त त्याच व्यक्तीला येतो आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीला ते ऐकू देखील येत नाही.

अनेक फिचर्संचा समावेश Noveto N1 हे डिव्हाइस मोशन सेन्सरचा वापर करते. हे युजर्सच्या हालचाली आणि डोक्याची हालचाल यावर लक्ष ठेवेल. यामुळे युजर अल्ट्रासॉनिक व्हेव्स  आणि आवाजाच्या संपर्कात राहिल. हे डिव्हाइस फेस रेकग्नेशन तंत्रज्ञानासह मिळणार असून यात उत्तम स्मार्ट असिस्टंटही मिळेल असा दावा कंपनीनं केला आहे. हे डिव्हाईस एका पोर्टेबल डिव्हाईसप्रमाणे वापरता येणार नाही. हे ग्राहकांना त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्येच वापरता येईल.

हे डिव्हाईस साऊंडबारप्रमाणेच दिसते. त्यावर कंट्रोल बटन्सही देण्यात आले आहेत. यात ३.५ मिमी ऑडिओ जॅक, यूएसबी सपोर्ट, वायफाय आणि ब्लूटूथ देखील आहे. सध्या या डिव्हाईसची किंमत तब्बल ८०० डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानmusicसंगीत