शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कशी आली 2 रूपयात इंटरनेट पुरवण्याची आयडिया? आता उडवलीये टेलिकॉम कंपन्यांची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 18:18 IST

एखाद्या चहाच्या गाडीवर इंटरनेटचं रिचार्ज करता येईल अशा कधी तुम्ही विचार केला होता का? ते देखील अवघ्या दोन रूपयात. स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे.

मुंबई: एखाद्या चहाच्या गाडीवर इंटरनेटचं रिचार्ज करता येईल अशा कधी तुम्ही विचार केला होता का? ते देखील अवघ्या दोन रूपयात. स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे.बंगळुरू येथील वाय-फाय डब्बा नावाची ही कंपनी अत्यंत स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवत आहे. वाय-फाय डब्बामुळे बंगळुरूमध्ये तुम्हाला किराणा दुकानांपासून ते अगदी चहाच्या गाडीपर्यंत सर्वच छोट्यामोठ्या ठिकाणी इंटरनेट खरेदी करणं शक्य होत आहे. वायफाय डब्बाची सुरूवात शुभेंदु शर्मा आणि करम लक्ष्मण यांनी केली. दोघांची एक मुलाखत 'आजतक'ने प्रसीद्ध केली आहे.  6 वर्षांच्या अपयशानंतर आणि 33 पेक्षा जास्त अॅप सुरू होऊन पुन्हा बंद झाल्यानंतर वायफाय डब्बामध्ये यशस्वी झाल्याचं  शुभेंदु शर्माने सांगितलं. जे आजपर्यंत इंटरनेटच्या वापरापासून दूर आहेत त्यांच्यासाठी याची सुरूवात करण्याचा विचार मनात आला. वायफाय डब्बा सुरू करण्याचा विचार कसा आला -गेल्या 6 वर्षांमध्ये आम्ही सोशल मीडियापासून टॅक्सी ड्रायव्हरांसाठी अनेक अॅप तयार केले. दरम्यान 2016 मध्ये आम्ही स्टेपनी लॉन्च केलं. खास टॅक्सी ड्रायव्हरांचा विचार करून हे अॅप आम्ही बनवलं होतं. आपले विचार सहज मांडण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरांना हे अॅप अत्यंत उपयोगी ठरेल असा आमचा विचार होता. पण आम्ही यामध्ये अपयशी ठरलो. टॅक्सी चालकांनी आमच्या अॅपमध्ये आवड न दाखवण्याचं कारण काय याचा आम्ही विचार केला असता दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे शहरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी खराब आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी आमचं अॅप खरेदी करणं कठीण होत आहे. तेव्हाच आम्ही विचार केला की सामान्य माणसासाठी एक स्वस्त इंटरनेट सेवा सुरू करावी  आणि त्यानंतर वायफाय डब्बाची सुरूवात झाली.  सुरूवात कशी झाली -वायफाय डब्बा सुरू करावा असा विचार आल्यानंतर 4 ते 5 आठवड्यात आम्ही प्रोटोटाइप तयार केला. अनेक चहाच्या गाडयांवर आम्ही याची चाचणी घेण्यास सुरूवात केली.  प्रोटोटाइप लावून झाल्याच्या काही तासांमध्येच अनेक लोकांनी हे वापरण्यास सुरूवात केली. ज्यावेळी अनेक लोक हे वापरत असल्याचं लक्षात आलं त्यानंतर हे व्यापक स्वरूपात सुरू करण्यास सुरूवात झाली.  काय आहे प्लॅन्स -  वाय-फाय डब्बा ही कंपनी केवळ दोन रूपयात 100 एमबी डेटा, 10 रूपयात 500 एमबी डेटा आणि अवघ्या 20 रूपयात तब्बल 1 जीबी डेटा पुरवत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 तासासाठी आहे. दुसरीकडे जिओ 19 रूपयात 150 एमबी डेटा आणि 52 रूपयात 1.05 जीबी डेटा पुरवते. सध्या ही कंपनी केवळ बंगळुरूत सेवा पुरवत आहे. ज्यांना रिचार्ज करायचं असेल त्यांना कंपनीचं हे डेटा प्रीपेड रिचार्ज कुपन छोट्या दुकानांवर, चहाच्या टपरीवर आदी ठिकाणी सहज उपलब्ध होईल. आम्ही वेगळ्या प्रकारचं अत्यंत वेगवान नेटवर्क देत आहोत.  आम्ही बंगळुरू शहरात तुम्हाला सर्वात स्वस्त आणि सर्वात वेगवान वायफाय देत आहोत. असं कंपनीच्या वेबसाइटवर लिहीलं आहे.आता मार्केटमध्ये नवीन कंपनी आल्याने इतर कंपन्या काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :WiFiवायफायInternetइंटरनेट