शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंटरनेट एक्सप्लोरर: २७ वर्षांचा प्रवास संपला, इंटरनेटच्या विश्वावर एकेकाळी हाेते राज्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 07:22 IST

जगातील सर्वांत लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ बंद होत आहे.

नवी दिल्ली :

जगातील सर्वांत लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ बंद होत आहे. आज, १५ जूनपासून मायक्रोसॉफ्ट आपली सेवा बंद करणार आहे. कंपनीने गेल्या वर्षीच याची घोषणा केली होती. इंटरनेट एक्सप्लोरर १९९५ मध्ये लाँच करण्यात आले होते. एकेकाळी इंटरनेटच्या जगावर या ब्राउझरचे वर्चस्व होते. २००३ पर्यंत मायक्रोसॉफ्टचा हा वेबब्राउझर अव्वल होता.

सन १९९५ मध्ये विंडोज ९५ साठी इंटरनेट एक्सप्लोरर लाँच झाले होते. त्या वेळी ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ खरेदी करावे लागायचे आणि त्यासाठी पैसे मोजावे लागत होते; परंतु नंतर ते सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध केले गेले. १९९९ पर्यंत, त्याच्या पाच आवृत्त्या आल्या होत्या. सन २००० नंतर इंटरनेट एक्सप्लोररची लोकप्रियता झपाट्याने वाढली. सन २००३ मध्ये त्याचा बाजारातील हिस्सा सुमारे ९५ टक्के होता आणि उपयुक्ततेच्या बाबतीत ते शिखरावर पोहोचले होते. लोकांना त्याचा इंटरफेस खूप आवडला होता. यामुळेच मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोररचे एकूण ११ व्हर्जन लाँच केले. इंटरनेट एक्सप्लोररची शेवटची आवृत्ती ऑक्टोबर २०१३ मध्ये रिलीज झाली. जानेवारी २०१५ मध्ये, कंपनीने ‘मायक्रोसॉफ्ट एज’ नावाचा नवीन वेब ब्राउझर सादर केला. पुढच्याच वर्षी, इंटरनेट एक्सप्लोररसाठी नवीन वैशिष्ट्यांचा विकास बंद करण्यात आला. तेव्हापासूनच इंटरनेट एक्सप्लोरर लवकरच इतिहासजमा होईल, असे मानले जात होते. 

‘मायक्रोसॉफ्ट एज’वर लक्ष केंद्रित केल्याचा फटका- नंतर लोकांना गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्सच्या रूपाने नवीन पर्याय मिळाले. इंटरनेट एक्सप्लोररवर मात करीत दोन्हींची लोकप्रियता अल्पावधीतच कमालीची वाढली. - अशा वेळी इंटरनेट एक्सप्लोररमध्ये सुधारणा करण्याऐवजी मायक्रोसॉफ्टनेही आपल्या नवीन वेब ब्राउझर ‘मायक्रोसॉफ्ट एज’वर लक्ष केंद्रित केले आणि आता इंटरनेट एक्सप्लोरर कायमचा निरोप दिला जात आहे. २७ वर्षे सेवा दिल्यानंतर आता इंटरनेट एक्सप्लोरर बंद होत असल्याने नेटकरीही भावुक झालेत. त्याला निरोप देताना इंटरनेटवर संबंधित अनेक मिम्स व पोस्ट शेअर होत आहेत.

टॅग्स :Internetइंटरनेट