इन्स्टाग्राम रील्सशी संबंधित एका फीचरवर सध्या काम करत आहे. Locked Reels असं या फीचरचं नाव असल्याचं म्हटलं जात आहे. या फीचरच्या मदतीने लोक त्यांच्या रील्सद्वारे इन्स्टाग्राम युजर्सशी अधिक चांगल्या प्रकारे इंटरॅक्ट करू शकतील. लवकरच तुम्ही पासवर्डच्या मदतीने तुमचे रील्स लॉक करू शकाल. हे फीचर विशेषतः अशा लोकांसाठी येत आहे जे स्वतःला इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर म्हणतात. हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
लॉक्ड रील्स फीचर म्हणजे काय?
नावावरुनच स्पष्ट होतं की, या फीचरच्या मदतीने युजर पासवर्डने त्यांचे रील्स लॉक करू शकतात. त्यामुळे ज्यांना पासवर्ड माहित आहे तेच ते रील्स पाहू शकतील. पासवर्ड-लॉक केलेलं रील असल्याने ते कमी लोकांना पाहता येईल असं अनेकांना वाटेल, पण तसं नाही.
एंगेजमेंट वाढेल
एखाद्या गोष्टीवर जर काही बंधनं घातली, तर त्या गोष्टीबद्दल जास्त आकर्षण वाटतं. हे फीचर देखील त्याच प्रकारे कार्य करणार आहे. उदाहरणार्थ, समजा एखादा मोठा इन्फ्लुएन्सर लॉक्ड रील्स फीचरसह त्याचे रील पब्लिश करतो आणि त्याच्या फॉलोअर्सना रीलच्या पासवर्डबद्दल तो एक हिंट देतो. जसं की त्या इन्फ्लुएन्सरच्या वाढदिवसाची तारीख. अशाप्रकारे लोकांमध्ये ते रील पाहण्याची क्रेझ वाढेल आणि त्या इन्फ्लुए्न्सरचे लॉयल फॉलोअर्स देखील ते रील एक्सेस करू शकतील.
लॉक्ड रील्सचा कोणाला होणार फायदा?
लॉक्ड रील्स हे फीचर प्रामुख्याने इन्फ्लुएन्सर्स, ब्रँड्स आणि क्रीएटर्स यांना लक्षात घेऊन डिझाइन केलं आहे. ज्याचा वापर एखाद्या उत्पादनाच्या लाँचिंगसाठी किंवा खास कँपेनसाठी केला जाऊ शकतो. काहींना असं वाटतंय की, हे फीचर युजर्सना रील्स स्क्रोल करताना त्रास देईल. इन्स्टाग्रामने अद्याप या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.