शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सरकारी एजन्सीने जारी केला इशारा, Apple यूजर्सना हॅकर्सचा धोका; कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 16:47 IST

CERT-In Update: हॅकर्स तुमच्या फोनवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतात.

CERT-In Update: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. पण, बरेच लोक त्यांचे फोन-टॅबलेट अपडेट करत नाहीत. असे न केल्याने तुमचा डिव्हाइस धोक्यात येऊ शकतो. हॅकर्स अशा डिव्हाइसवर लक्ष ठेवून असतात. दरम्यान, अलीकडेच iOS आणि iPad OS मध्ये दोष आढळून आला आहे. याबाबत CERT-In ने Apple युजर्सना नवीन OS अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

हॅकर्स नेहमी संधीच्या शोधात असतात. त्यामुळे तुम्ही जुन्या OS वर काम करत असाल, तर हॅकिंगला बळी पडू शकता. CERT-In (Computer Emergency Response Team) ने अॅपल युजर्ससाठी एक इशारा जारी केली आहे. 14 ऑक्टोबर 2023 रोजी जारी केलेल्या नोट CIVN-2023-0303 मध्ये Apple iOS आणि iPad OS बाबत इशारा देण्यात आला आहे. 

CERT-in म्हणजे काय?CERT-In ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एजन्सी आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, या सरकारी एजन्सीचे काम सायबर सुरक्षेशी संबंधित बाबी हाताळणे आहे. ही एजन्सी इंटरनेटशी संबंधित सर्व गोष्टींवर नजर ठेवते, ज्याच्या मदतीने लोकांना कोणत्याही धोक्याची वेळीच माहिती दिली जाऊ शकते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नोटमध्ये CERT-In ने जुन्या iOS आणि iPad OS बद्दल इशारा जारी केला आहे. 

हॅकर्स लक्ष्य करू शकतातया जुन्या ओएसमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्स तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. तुमच्या iPhone किंवा iPad ची ऑपरेटिंग सिस्टम 16.7.1 पेक्षा पूर्वीची असेल, तर तुम्हाला धोका आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही तात्काळ डिव्हाइस अपडेट केला पाहिजे. या त्रुटी दूर करण्यासाठी Apple ने आधीच सुरक्षा अपडेट जारी केले आहे. 

अपडेटचे फायदे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केल्यानंतर, डिव्हाइसमधून फक्त त्रुटी दूर होत नाहीत, तर फोनचा परफॉर्मन्सही चांगला होतो. यासोबतच तुम्हाला नवीन फीचर्सदेखील मिळतील. त्यामुळेच युजरने वेळोवेळी फोन अपडेट केला पाहिजे. फोन अपडेट ऑटो किंवा मॅन्युअल, दोन्ही पद्धतीने केला जातो.

 

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान