शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Twitter वर IndiaFightsCorona साठी मदतीचे हात सरसावले; ट्विट्स तब्बल १९५८ टक्‍क्‍यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:05 IST

Twitter And India Fights Corona : भारतातील लोक एकमेकांना साह्य करण्‍यासाठी पुढे सरसावले दुसऱ्या लाटेदरम्‍यान भारतातील वैद्यकीय व्‍यावसायिकांकडून ट्विट्समध्‍ये १.५ पटीने (५० टक्‍के) वाढ झाली, त्‍यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगण्‍यासाठी ट्विटरचा वापर केला.

नवी दिल्ली - ट्विटरच्‍या संशोधनाने सर्व्हिसवर झालेल्‍या संवादांबाबत माहिती मिळवण्‍यासाठी भारतातील कोविडच्‍या दुसऱ्या लाटेच्‍या सुरुवातीच्‍या महिन्‍यांदरम्‍यान (१ एप्रिल ते ३१ मे २०२१) पाठवण्‍यात आलेल्‍या कोविड-१९ ट्विटसचा शोध, विश्‍लेषण व तुलना केली, मागील महिन्‍यांच्‍या तुलनेत (१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२१) ट्विट्समध्‍ये वाढ झाल्‍याचे निदर्शनास आले असे निदर्शनास आले की, दुस-या लाटेदरम्‍यान (१ एप्रिल ते ३१ मे २०२१) भारतातील कोविड-१९ बाबत करण्‍यात आलेल्‍या ट्विट्सच्‍या दैनंदिन सरासरीमध्‍ये ६०० टक्क्यांहून अधिक (७ पट) वाढ झाली

भारतातील लोक एकमेकांना साह्य करण्‍यासाठी पुढे सरसावले दुसऱ्या लाटेदरम्‍यान भारतातील वैद्यकीय व्‍यावसायिकांकडून ट्विट्समध्‍ये १.५ पटीने (५० टक्‍के) वाढ झाली, त्‍यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगण्‍यासाठी ट्विटरचा वापर केला. कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्‍यापासून ट्विटरने लोकांना कनेक्‍टेड राहण्‍यासोबत विश्‍वसनीय स्रोतांकडून योग्‍य माहिती देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषत: मागील एक वर्षामध्‍ये लोकांनी ट्विटरचा अधिकाधिक वापर केला आहे. भारतामध्‍ये कोविड-१९ च्‍या दुसऱ्या या लाटेच्‍या उद्रेकासह ट्विटर रिअल-टाइम हेल्‍पलाइन म्‍हणून उदयास आले, जेथे लोकांना सर्व्हिसचा आधार घेत जीवनदायी सुविधा, औषधे, अन्‍न अशा गोष्‍टींची मागणी करण्‍यासोबत त्‍यांचा पुरवठा देखील केला. सर्व्हिसवर एकमेकांना साह्य करण्‍याच्‍या अविश्‍वसनीय सकारात्‍मक जन चळवळीला चालना मिळाली. १ एप्रिल ते ३१ मे २०२१ दरम्‍यान कोविड-१९ संदर्भातील ट्विट्समध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि सर्व्हिसवर मागील दोन महिन्‍यांच्‍या (१ फेब्रुवारी ते ३१ मार्च) तुलनेत कोविड-१९ संदर्भातील संवादांमध्‍ये १०० टक्‍के वाढ झाली. ट्विटरने या वाढीचे विश्‍लेषण केले आणि संवादांना चार व्‍यापक विभागांमध्‍ये विभागले: 

वैद्यकीय साह्य - वैद्यकीय मदत मागण्‍याशी किंवा देण्‍याशी संबंधित असलेल्‍या ट्विट्समध्‍ये १९५८ टक्क्यांनी (२० पट) वाढ झाली. दुसऱ्या लाटेदरम्‍यान #Covid19 ७७ टक्‍के अधिक ट्विट करण्‍यात आले, फेब्रुवारी व मार्च महिन्‍यांच्‍या तुलनेत #Blood ७२ टक्‍के अधिक ट्विट करण्यात आले, #Plasma मध्‍ये ८३४ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली आणि या कालावधीदरम्‍यान #SOS १५२ टक्‍के अधिक ट्विट करण्‍यात आले. खरेतर, मदत मागणारे लोक आणि त्‍यांना आवश्‍यक संसाधने मिळवून देणा-या स्‍वयंसेवकांमधील ट्विट्सच्‍या देवाणघेवाणीमुळे प्रतिक्रियांच्‍या प्रमाणामध्‍ये १.५ पट वाढ झाली.

कोविड-१९ लसींचे वितरण वाढण्‍यासोबत लसीकरण मोहिमांना चालना मिळाल्‍यामुळे लोकांनी ट्विटरवर लसीबाबत जागरूकता, उपलब्‍धता अशा संवादांना फॉलो करण्‍यासोबत त्‍यामध्‍ये सहभाग घेतला. #Vaccine आणि #Vaccination बाबतच्‍या ट्विट्समध्‍ये २४६ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. या संवादाला पाठिंबा देण्‍यासाठी ट्विटरने होम टाइमलाइन प्रॉम्‍प्‍ट (home Timeline prompt) सादर केले, जे लोकांना अधिकृत स्रोतांकडून लस-संबंधित अपडेट्स आणि माहिती देते.  

माहितीची देवाणघेवाण - सर्व्हिसवर तज्ञ संस्‍था, अधिकृत सरकारी अकाऊंट्स, आरोग्‍य व्‍यावसायिक व एपिडेमिओलॉजिस्‍ट्स असल्‍यामुळे लोकांना नवीन विकास, सर्वोत्तम कोविड-१९ आचरण, लसीकरण मोहिमा आणि इतर संबंधित गोष्‍टींबाबत अचूक माहिती मिळाली. त्‍यांनी इतरांसाठी #CoronavirusUpdates, #CoronaIndiaUpdate, #Covid19IndiaResources या हॅशटॅग्‍ससह ट्विट केले, ज्‍यामुळे संवादांमध्‍ये ९१६ टक्‍क्‍यांनी (१० पट) वाढ झाली. 

निधी साह्य - माणुसकी व सहाय्यतेच्‍या उत्‍साहामध्‍ये वाढ झाली. लोकांनी मदतकार्यामध्‍ये योगदान देण्‍यासाठी पुढाकार घेतला आणि निधी साह्य संदर्भातील संवादांमध्‍ये ७३१ टक्‍क्‍यांची (८ पट) वाढ झाली. ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटर पॅट कमिन्‍स याचे (@patcummins30) भारताला आर्थिक साह्य घोषित करणाऱ्या ट्विटला (Tweet) सर्वाधिक लाइक मिळाले आणि या कालावधीदरम्‍यान सर्वाधिक रिट्विटेड ट्विट ठरले. 

मानसिक आरोग्‍य - लोकांनी मानसिक आरोग्‍याला सर्वाधिक प्राधान्‍य दिले आणि दुसऱ्या या लाटेदरम्‍यान यामध्‍ये १५३ टक्‍क्‍यांची (२.५ पट) वाढ झाली. लोकांनी #DoctorsMentalhealth, #CovidCounselling, #CovidDepression, #CovidInsomnia अशा हॅशटॅग्‍ससह ट्विट केले. प्रार्थना किंवा आशा प्रबळ भावना ठरण्‍यासोबत नमस्‍कार करणा-या हाताचे चिन्‍ह 🙏 सर्वाधिक ट्विट करण्‍यात आलेले इमोजी ठरले. #IndiaFightsCorona संदर्भातील ट्विट्समध्‍ये ५३० टक्‍क्‍यांची वाढ झाली, तसेच स्‍थानिक व राज्‍य-निहाय संवाद #DelhiFightsCorona व #MaharashtraFightsCorona याबाबतच्‍या ट्विट्समध्‍ये देखील लक्षणीय वाढ झाली. या दोन्‍ही संवादांमध्‍ये अनुक्रमे १८७२ टक्‍के व २३७७ टक्‍क्‍यांची वाढ झाली. ट्विटरने प्रांतामधील विश्वसनीय अपडेट्ससाठी विविध स्‍टेट स्‍पेसिफिक इव्‍हेण्‍ट पेजेससह (state-specific Event Pages) विविध वैशिष्‍ट्ये देखील सादर केली. तसेच ट्विटर लोकांच्‍या संवादांना वाव देण्‍याशी कटिबद्ध आहे. ट्विटरने भारतातील कोविड-१९ संवादांना पाठिंबा देणारी अनेक वैशिष्‍ट्ये व उपक्रम सादर केले. यांपैकी काही म्‍हणजे एक्‍स्‍प्‍लोरर पेजवरील समर्पित कोविड-१९ हब (COVID-19 hub), अधिकृत व विश्‍वसनीय सरकारी संस्‍था, मीडिया व नागरी समाज स्रोतांकडून स्‍थानिक भाषांमध्‍ये नवीन ट्विट्सची माहिती देणारे ट्विटर इव्‍हेण्‍ट्स पेजेस् (Twitter Events Pages), एसओएस पेज (SOS page), संबंधित टॉपिक्‍स (Topics,), फॉलो करण्‍यासाठी विश्‍वसनीय अकाऊंट्सच्‍या ट्विटर लिस्‍ट्स (Twitter Lists). सर्व्हिसवरील अकाऊंट होल्‍डर्सना महत्त्वपूर्ण समस्‍यांची माहिती देण्‍यासाठी डब्‍ल्‍यूएचओने देखील पुढाकार घेतला आहे (WHO has also engaged ). ट्विटरने लोकांना योग्‍य माहिती उपलब्‍ध करून देण्‍यासोबत कनेक्‍टेड राहण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी भारतामध्‍ये रोल-आऊट ऑफ स्‍पेसेसला देखील प्राधान्‍य दिले (prioritised the roll-out of Spaces in India).  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटरtechnologyतंत्रज्ञान