शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गुगल मॅपचा वाढता वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:54 IST

इंटरनेटच्या विश्वात गुगलला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असून अनेकांना गुगल आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना करणेही शक्य नाही. गुगल मॅप हे गुगलमधील सर्वाधिक वापरल्या जाणा-या फिचर्सपैकी एक होय.

प्राची सोनवणेइंटरनेटच्या विश्वात गुगलला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असून अनेकांना गुगल आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना करणेही शक्य नाही. गुगल मॅप हे गुगलमधील सर्वाधिक वापरल्या जाणा-या फिचर्सपैकी एक होय. गुगल मॅपचा वापर एखाद्या ठरावीक ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश लोक करतात. गुगल आपल्या युजर्सला गुगल मॅपच्या साहाय्याने सलग अपडेट्स देत असतो. जर अज्ञातस्थळी रस्ता भटकले असाल तर तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने योग्य ठिकाणी पोहोचू शकता. काही ट्रिक्सचा वापर अचूकरीत्या केला तर त्याच्या मदतीने गुगल मॅप आणखीन चांगल्या प्रकारे वापरु शकता आणि त्याचबरोबर गुगल मॅपसोबत मिळून पैसेही कमाविण्याची संधीही आता उपलब्ध झालेली आहे. नेटवर्क किंवा इंटरनेट नसतानाही गुगल मॅप वापरु शकता.तुम्ही तुमच्या घरचा पत्ता, आॅफिसचा पत्ता किंवा नातेवाइकांचा पत्ताही गुगल मॅपवर अ‍ॅड करू शकता. तुम्ही यामुळे वारंवार रस्ता चुकू शकत नाही. यामुळे नेव्हिगेशनमध्येही खूप मदत होते. तुमचा एखादा मित्र जर तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे, त्याला तुमचे लोकेशन शोधण्यात अडथळा येत आहे. तेव्हा तुम्ही लोकेशनदेखील शेअर करू शकता.तुम्ही आपल्या आवडत्या दुकानांत, मॉल्समध्ये जर वारंवार जात असाल तर ही ठिकाणे तुम्ही आपल्या मॅपवर सेव्ह करू शकता. यामुळे नेव्हिगेशनमध्ये कुठलाच अडथळा तुम्हाला येत नाही. तुम्ही या मॅपचा वापर तुमचा प्रवास सुखकर करण्यासाठी करू शकता. गुगल मॅप आणखीन चांगले बनविण्यासाठी जर तुम्ही मदत कराल तर गुगल त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे देते. यासाठी आसपासच्या जागा, लोकेशनची माहिती गुगल मॅपवर योग्य पद्धतीने द्यावी लागणार आहे.दुचाकीस्वारांसाठी शॉर्टकटरस्त्यावरून गाडी चालवताना वाहतूककोंडीसारख्या समस्येमुळे वाहनधारकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागतो. महामार्गावर चारचाकी गाड्यांची रस्त्यांवर रांगच रांग लागली असताना दुचाकीवाले मात्र मिळणाºया अगदी कमी जागेतून पुढे पुढे जाताना दिसतात. गुगलच्या नव्या टू-व्हीलर मॅप अ‍ॅपमुळे दुचाकीस्वारांना ट्राफिकमधून वाट काढण्याला एक सोपा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.असे आहे या अ‍ॅपचे कामलवकरच हे अप लाँच होणार असून, जे लोक दुचाकीवरून लांबचा प्रवास करतात किंवा अगदी किचकट आणि गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चालवतात, अशा लोकांसाठी हे अ‍ॅप अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणार आहे. आपण थांबलेल्या ठिकाणापासून आपल्याला पोहोचायचे असलेल्या निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगलचे हे टू-व्हीलर मॅप अ‍ॅप मार्गदर्शन करणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगल