शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत जिओचा महागाईचा धमाका, आता 459 रुपयांत दररोज मिळणार 4जी स्पीडनं 1 जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 20:48 IST

रिलायन्स जिओनं ग्राहकांसाठी नवा सुपरबूस्ट प्लॅन बाजारात आणला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर जिओ कंपनी ग्राहकांना 459 रुपयांत तीन महिन्यांकरिता प्रत्येक दिवशी 2 जीबी 4जी डेटा देणार आहे.

मुंबई- रिलायन्स जिओनं ग्राहकांसाठी नव्या प्लॅनच्या किमतीत 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर जिओ कंपनी ग्राहकांना 459 रुपयांत तीन महिन्यांकरिता प्रत्येक दिवशी 1 जीबी 4जी डेटा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. या 84 दिवसांच्या प्लॅनसाठी तुम्हाला फक्त 459 रुपये मोजावे लागणार आहे. तत्पूर्वी जिओ 149 रुपयांत 28 दिवसांसाठी प्रत्येक दिवशी 1 जीबीप्रमाणे 4जी डेटा देत होती. परंतु या दिवाळीच्या मुहूर्तावर जिओनं प्लॅनच्या किमतीत वाढ केल्यामुळे ग्राहकांना याचा भुर्दंड पडणार आहे. जिओनं एका आठवड्यासाठी 52 रुपयांचा प्लॅनसुद्धा आणला आहे. तसेच 98 रुपयांमधल्या प्लॅनमध्ये दोन आठवड्यांसाठी ग्राहकांना मोफत कॉलिंग, एसएमएस व अनलिमिटेड डेटा (0.15 जीबी रोज)मिळणार आहे.तर काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने नवीन 'दिवाळी धन-धना-धन ऑफर' आणली होती. यामध्ये 399 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळणार होतं. 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान ही ऑफर असणार आहे. दिवाळी धन-धना-धन ऑफरमध्ये 399 रुपयांच्या रिचार्जवर वाउचर स्वरूपात 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. 50 रुपयांचे 8 वाउचर ग्राहकांना मिळतील. My Jio अॅपमध्ये हे 8 वाउचर्स मिळतील. या वाउचर्सचा फायदा भविष्यात 309 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज किंवा 91 रुपये आणि त्यापेक्षा जास्तीचा डेटा रिचार्ज करताना घेता येणार आहे.  पण 15 नोव्हेंबर नंतरच या वाउचर्सचा वापर करता येणार आहे. 

जिओ युजर्स सावधान ! 'या' अटीचं उल्लंघन केल्यास फ्री कॉल सर्व्हिस होणार बंदरिलायन्स जिओ रोज नवनवे प्लान्स आणून मोबाइल युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान रिलायन्स जिओ आपल्या युजर्सना झटका देण्याच्या तयारीत आहे. जिओने अशा युजर्सवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे, जे दिवसाला 300 हून अधिक जास्त कॉल्स करत आहेत. आपल्या जिओ क्रमांकाचा व्यावसायिक वापर करणा-यांवर जिओची नजर आहे. रिलायन्स जिओदेखील इतर कंपन्यांप्रमाणे डेली लिमिट लागू करण्याची शक्यता आहे. काही मोबाइल कंपन्या दिवसाला 300 फोन कॉल्स आणि संपुर्ण आठवड्यात 1200 हून जास्त फ्री कॉल्स करण्याची सुविधा देत नाहीत, त्याहून जास्त कॉल केल्यास चार्ज लागतो. रिलायन्स जिओदेखील अशाप्रकारे मर्यादा लागू करण्याची शक्यता आहे.

व्यवसायिक वापरसाठी जिओ क्रमांकाचा वापर करणा-यांवर जिओने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हीदेखील जिओ क्रमांकाचा व्यवसायिक वापर करत असाल तर कॉल लिमिट लागू होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमची सेवा अखंडित ठेवायची असल्यास व्यवसायिक वापर करणं बंद करावं लागणार आहे. व्यवसायिक वापर केल्यास कंपनीकडे फ्री कॉलिंग बंद करण्याचा अधिकार आहे.

रिलायन्स जिओने आपल्या 4जी फोनची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. जिओ हा फोन शून्य रुपयात देत आहे. त्यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे 1500 रुपयांचं सेक्युरिटी डिपॉजिट भरावं लागेल. हे डिपॉजिट तीन वर्षांनी पुन्हा परत केलं जाईल. संपुर्ण डिपॉजिट परत हवं असल्यास, वर्षाला किमान 1500 रुपयांचा रिचार्ज करणं बंधनकारक असणार आहे. तेव्हाच तुम्हाला तुमचे 1500 रुपये परत मिळतील. 

जर तुम्ही जिओ मोबाइल फोनचं प्री बुकिंग केलं होतं आणि अद्याप तुम्हाला तो मिळाला नसेल तर तुम्ही ते माहिती करु शकता. तुमच्या मोबाइल फोनचा स्टेटस काय आहे हे जाणून घेण्यासाठी 18008908900 या क्रमांकावर फोन करा. येथे तुमचा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक मागितला जाईल. ज्या मोबाइल क्रमांकावरुन तुम्ही जिओ मोबाइल फोनचं प्री बुकिंग केलं असेल तोच क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक द्याल तेव्हा तुमच्या फोनचं स्टेटस कळेल.