शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आता गुगलची ही ई-मेल सेवा बंद होणार

By अनिल भापकर | Updated: March 22, 2019 13:35 IST

गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती .इनबॉक्सची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनवर देखील वापरता येत होती . आता मात्र ०२ एप्रिल २०१९ पासून हि सेवा पूर्णतः बंद करण्याचे गुगलने ठरविले आहे.

ठळक मुद्देसुरुवातीला प्रति युझर १ जीबी स्टोरेज कॅपॅसिटी जी-मेल कडून देण्यात येत होती जी त्यावेळच्या इतर कुठल्याही ई-मेल सेवा देणाऱ्यापेक्षा खूप जास्त होती . गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती आता ०२ एप्रिल २०१९ रोजी इनबॉक्सची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तशी नोटीसच इनबॉक्स युझर्सला गुगलतर्फे पाठवण्यात आली आहे.

अनिल भापकर

इंटरनेट सर्चिंगचा बादशाह आणि ई-मेल सेवेमध्ये अव्वल स्थानी असलेल्या गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती . गुगलच्या या  ई-मेल सेवेमध्ये  युझर्स च्या गरजा लक्षात घेऊन अनेक चांगले फीचर्स देण्यात आले होते. इनबॉक्स ही सेवा  जी-मेल सारखी असली तरी ही पूर्णपणे स्वतंत्र अशी सेवा होती . इनबॉक्सची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनवर देखील वापरता येत होती . आता मात्र ०२ एप्रिल २०१९ पासून हि सेवा पूर्णतः बंद करण्याचे गुगलने ठरविले आहे.  

२००४ साली गुगलने  जी-मेल च्या माध्यमातून ई-मेल सेवेमध्ये प्रवेश केला . सुरुवातीला  प्रति युझर १ जीबी स्टोरेज कॅपॅसिटी  जी-मेल कडून देण्यात येत होती जी त्यावेळच्या इतर कुठल्याही ई-मेल सेवा देणाऱ्यापेक्षा खूप जास्त होती . त्यामुळे  जी-मेल अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले.अजूनही  ई-मेल सेवा देण्यामध्ये जी-मेलची सेवा वरचढच आहे.

याच गुगलने २०१४ साली इनबॉक्स नावाने एक स्वतंत्र ई-मेल सेवा मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती. युझर्सच्या गरजा लक्षात घेऊन खूप साऱ्या नवीन सुविधेसह इनबॉक्स सुरु  करण्यात आले होते . एक परिपूर्ण  ई-मेल सेवा कशी होईल या दृष्टीने गुगलने  यामध्ये अनेक नवीन फीचर्स दिले होते. जरी इनबॉक्स हि ई-मेल सेवा गुगलने सुरु केली असली तरी सुद्धा  जी-मेल हि  ई-मेल सेवा सुद्धा चालूच होती .

मात्र मागील वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०१८ मध्ये गुगलने अचानक जाहीर केले कि गुगलची इनबॉक्स हि  ई-मेल सेवा मार्च २०१९ मध्ये बंद करण्यात येईल .गुगलच्या या निर्णयाने खरे तर टेक्नोसॅव्ही जगतामध्ये मोठी खळबळ उडाली होती. ३१ मार्च २०१९ पर्यंतच इनबॉक्सची सेवा बंद होणार होती मात्र गुगलने आणखी दोन दिवसाची मुदतवाढ देत आता ०२ एप्रिल २०१९ रोजी इनबॉक्सची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तशी नोटीसच इनबॉक्स युझर्सला गुगलतर्फे पाठवण्यात आली आहे. इनबॉक्सचे अनेक चांगले फीचर्स हे गुगलकडून जी-मेलमध्ये देण्यात आले आहे.

anil.bhapkar@lokmat.com

टॅग्स :googleगुगलAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल