शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

5 वर्षांत संपूर्ण जग बदलणार, प्रत्येक इंटरनेट युजरकडे स्वतःचा रोबोट असणार अन्...; Bill Gates यांची भविष्‍यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 14:27 IST

येणाऱ्या पाच वर्षांत एआयमुळे संपूर्ण भविष्य बदलून जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

सध्या संपूर्ण जगात एआय संदर्भात प्रचंड चर्चा सुरू आहे. एआयला केंद्रस्थानी ठेऊन भविष्याची कल्पना केली जात आहे. यातच आता, मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनीही एआयसंदर्भात भाष्य केले आहे. येणाऱ्या पाच वर्षांत एआयमुळे संपूर्ण भविष्य बदलून जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

पाच वर्षांत प्रत्येकाकडे असेल स्वतःचा रोबोट -मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांच्या मते, लवकरच प्रत्येकाकडे स्वतःचा एक रोबोट असेल, जो युजर्सना अनेक कामात मदत करेल. इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक दुसर्या युजरकडे पर्सनल असिस्टंट असेल. जो आजच्या टेक्नॉलॉजीच्या तुलनेत अत्यंत चांगला असेल. एवढेच नाही, तर एजन्ट्स अधिक स्मार्ट असतात. एखाद्या कामासंदर्भात विचारण्याआधीच सल्ला देण्याची खासियत त्यांच्यात असते.

माणसाला प्रत्येक कामात होईल एआयची मदत - बिल गेट्स म्हणाले, भविष्यातील पर्सनल असिस्टन्ट प्रत्येक काम करण्यास तरबेज असेल. आज ट्रिप प्लॅनिंगसाठी ट्रॅव्हल एजन्ट्सना पैसे द्यावे लागतात. याच बरोबर ट्रॅव्हल एजन्टला वेळही द्यावा लागतो. जेणेकरून त्यांना आपल्या आवडीप्रमाणे टूरिस्ट स्पॉटही सांगता येतील. या उलट एआय आपल्या युजर्ससाठी ट्रिप प्लॅनही करू शकते. एवढेच नाही, तर एआय युजर्सना त्यांच्या आवडीच्या पदार्थानुसार, रेस्टोरन्ट्सची माहितीही देईल. तसेच, रिझर्व्हेशन बुक करायचेही काम करेल.

एआय असिस्टन्टसाठी मोजावी लागेल मोठी किंमत - बिल गेट्स यांच्या मते, कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एजन्ट्सची सुविधाही देऊ शकतात. या एजन्ट्सना मिटिंग्समध्येही सहभागी केले जाऊ शकते. जेणे करून त्यांना प्रश्नांची चांगली उत्तरे देता येतील. अशा प्रकारच्या एआय एजन्ट्सना ठेण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर पेसैही मोजू शकतात. भविष्यात अशा प्रकारचे एजन्ट्स अत्यंत महागडे असतील. एवढेच नाही, तर ते केवळ कार्यालयीन कामेच नाही, तर प्रत्येक ठिकाणी ते चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतील.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसtechnologyतंत्रज्ञान