शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आयमॅक प्रो : जाणून घ्या फिचर्स व भारतातील मूल्य

By शेखर पाटील | Updated: December 20, 2017 12:21 IST

अ‍ॅपलने आपले आयमॅक प्रो हे उच्च श्रेणीतले वर्कस्टेशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे

मुंबई - अ‍ॅपलने आपले आयमॅक प्रो हे उच्च श्रेणीतले वर्कस्टेशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

अ‍ॅपलच्या आयमॅक प्रो या मॉडेलची अमेरिकेत विक्री सुरू झाली आहे. यासोबत हे वर्कस्टेशन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. हे मॉडेल विविध व्हेरियंटमध्ये ग्राहकांना सादर करण्यात येणार असून याच्या बेस मॉडेलचे मूल्य ४१,५०० रूपये असून अन्य व्हेरियंट हे यापेक्षा जास्त मूल्याचे आहेत.

आयमॅक प्रो या मॉडेलमध्ये अतिशय उच्च दर्जाचे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. यातील बेस मॉडेलमध्ये २७ इंच आकारमानाचा रेटीना या प्रकारातील तब्बल ५-के म्हणजे ५१२० बाय २८८९ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले आहे. यात ८-कोअर इंटेल झेनॉन डब्ल्यू प्रोसेसर देण्यात आला आहे. याला ८ जीबी रॅमयुक्त रॅडीऑन प्रो व्हेगा ५६ या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली आहे. यात तब्बल ३२ जीबी रॅम तर एक टेराबाईट (टिबी) स्टोअरेज देण्यात आले आहे. हायर व्हेरियंटसाठी १२८ जीबीपर्यंत रॅम आणि ४ टेराबाईट स्टोअरेजचे पर्याय असतील.

आयमॅक प्रो वर्कस्टेशनमध्ये १०८० पिक्सल्स क्षमतेचा फेसटाईम एचडी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत स्पेस ग्रे मॅजिक कि-बोर्ड आणि मॅजिक माऊस असेल. तर यातील फिचर्समध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी, इथरनेट पोर्ट, चार युएसबी टाईप-ए पोर्ट, चार थंडरबोल्ट पोर्ट, तीन युएसबी टाईप-सी पोर्ट, चार मायक्रोफोन्स, हेडफोन जॅक, एसडीएक्ससी कार्ड स्लॉट आदींचा समावेश असेल.

आयमॅक प्रो हे मॉडेल उच्च ग्राफीक्स, थ्री-डी इमेजींग, रिअलटाईम ४-के अथवा ८-के व्हिडीओ एडिटींग तसेच उच्च क्षमतेची आवश्यकता असणार्‍या विविध प्रोफेशनल कामांसाठी वापरणे शक्य आहे.

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानApple Inc.अॅपल