शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

आयडियाची कल्पना! दुधवाल्यांमुळे मराठमोळ्या तरुणाची 'फोर्ब्स' भरारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 11:16 IST

३० अंडर ३० या फोर्ब्सच्या यादीत ठाण्याच्या तरुणाचे नाव झळकले आहे.

मुंबई : एखादा व्यवसाय सुरु करताना तो कितपत यश मिळवेल याचे अंदाज बांधणे फारच कठीण असते. मात्र, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर व्यवसायाला उभारी देत एका मराठमोळ्या तरुणाने चक्क फोर्ब्सच्या यादीत नाव नोंदवले आहे. सागर यरनाळकर असे या तरुणाचे नाव असून त्याने राबविलेल्या कल्पनेची दखल जगभरातील अब्जाधीशांची नावे झळकवणाऱ्या फोर्ब्सलाही घ्यावी लागली आहे. 

गावागावात दूध उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. हे दूध शहरांत घरोघरी पोहचविणारेही आहेत. या दुधवाल्यांच्या जाळ्याचा पुरेपूर वापर करत या मराठमोळ्या तरुणाने घरोघरी भाजीपाला, फळे आणि किराणा माल पोहचविण्याची व्यवस्था केली आहे. ही सुविधा पोहोचवण्यासाठी सागरने डेली निंजा (DailyNinja) हे अ‍ॅप बनविले आहे. यामध्ये त्याला अनुराग गुप्ता यानेही मदत केली आहे. 

 सागर मूळचा ठाण्यातील असून त्याने इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ३० अंडर ३० या फोर्ब्सच्या यादीत सागरचे नाव झळकले आहे. त्याला नोकरीनिमित्त बेंगळुरुला मित्रांसोबत राहत असताना ही कल्पना सुचली होती. आळशी मित्रांमुळे त्याला दूधवाल्यालाच ब्रेड, इडलीचे पीठ आदी वस्तू आणायला सांगावे लागायचे. यामुळे ही कल्पना प्रत्यक्षात राबविली तर, असा विचार करून मित्राच्या साथीने हा व्यवसाय सुरु केला. 

देशात बहुतांश घरामध्ये सकाळी सकाळी दूध पुरविले जाते. यामुळे या दुधवाल्यांशीच करार करून त्यांच्याद्वारेच दैनंदिन वापराचे साहित्य पाठवले तर ग्राहकांनाही सकाळी उठून दुकानात जाण्याची कटकट संपेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. ही योजना राबविण्यासाठी दुधवाल्यांना ऑर्डर मिळणे गरजेचे बनले. यानुसार अ‍ॅप आणले आणि ही कल्पना कमालीची यशस्वी ठरली. 

 

 

फायदा काय? महत्वाचे म्हणजे महिन्याच्या महिन्याला दूधाच्या बिलाबरोबरच किराण्याचे बिल द्यावे लागते. तसेच अचानक काही संपल्यास रात्री 11 वाजेपर्यंत सांगण्याची सोय आहे. त्यामुळे सकाळी सकाळी कोणत्याही दुकानात जाण्याची गरज राहत नाही. दूधवाला येताना सोबत त्या वस्तूही पोहचवितो. बेंगळुरुमध्ये हे अॅप सुरु करण्यात आले होते. नंतर मुंबई, पुणे या शहरांमध्ये एकूण 58 हजार युजर्स आहेत. काही महिन्यांपूर्वी फोर्ब्सकडून फोन आला आणि त्यांनी कल्पना आवडल्याचे सांगितले. साडे तीन वर्षांपूर्वी हे अ‍ॅप सुरु केले होते. 

टॅग्स :Forbesफोर्ब्सmarathiमराठीthaneठाणेMilk Supplyदूध पुरवठाmilkदूध