वेगवान प्रोसेसर आणि शानदार डिस्प्लेसह Huawei Nova 9 आणि Nova 9 Pro सादर 

By सिद्धेश जाधव | Published: September 24, 2021 05:31 PM2021-09-24T17:31:28+5:302021-09-24T17:31:49+5:30

Huawei ने क्वॉड कॅमेरा सेटअप आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC सह Huawei Nova 9 आणि Nova 9 Pro सादर करण्यात आले आहेत. 

Huawei nova 9 nova 9 pro launch with 120hz refress rate snapdragon 778g soc   | वेगवान प्रोसेसर आणि शानदार डिस्प्लेसह Huawei Nova 9 आणि Nova 9 Pro सादर 

वेगवान प्रोसेसर आणि शानदार डिस्प्लेसह Huawei Nova 9 आणि Nova 9 Pro सादर 

Next

Huawei ने आपल्या होम मार्केट चीनमध्ये दोन जबरदस्त स्मार्टफोन्स सादर केले आहेत. हे स्मार्टफोन Huawei Nova 9 आणि Nova 9 Pro नावाने सादर करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. फक्त डिस्प्लेचा आकार, सेल्फी कॅमेरा आणि चार्जिंग स्पीडमध्ये अंतर आहे.  

Huawei Nova 9 आणि Huawei Nova 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

दोन्ही फोन कंपनीच्या ओपनसोर्स HarmonyOS 2 वर चालतात. या फोन्समधील डिस्प्ले फुल-एचडी+ रिजोल्यूशन, 19.5:9 अस्पेक्ट रेश्यो, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटसह सादर करण्यात आले आहेत. Huawei Nova 9 मध्ये 6.57- इंचाचा डिस्प्ले आहे तर प्रो मॉडेलमध्ये 6.72-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.  

दोन्ही फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC, Adreno 642L GPU आणि 8GB RAM ची प्रोसेसिंग पॉवर मिळते. क्वॉड-रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे, जे एलईडी फ्लॅशसह येतात. हुवाय नोवा 9 च्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. Huawei Nova 9 Pro मात्र 32 मेगापिक्सलच्या दोन सेल्फी कॅमेऱ्यांना सपोर्ट करतो.  

कनेक्टिविटीसाठी डिवाइसमध्ये 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि एक USB टाइप-C पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अ‍ॅक्सेलेरोमीटर, अ‍ॅम्बिएंट लाईट, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि एक प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची मदत घेण्यात आली आहे. दोन्ही फोन 4,300mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आले आहेत. Nova 9 चा चार्जिंग स्पीड 66W आहे तर प्रो मॉडेल 100W सुपर फास्ट चार्जला सपोर्ट करतो.  

Huawei Nova 9 आणि Nova 9 Pro ची किंमत 

  • Huawei Nova 9 128GB: CNY 2,699 (सुमारे 30,800 रुपये)  
  • Huawei Nova 9 256GB: CNY 2,999 (सुमारे 34,200 रुपये)  
  • Huawei Nova 9 Pro 128GB: CNY 3,499 (सुमारे 40,000 रुपये)  
  • Huawei Nova 9 Pro 256GB: CNY 3,899 (सुमारे 44,500 रुपये)  

हे फोन सध्या चीनमध्ये लाँच झाले असून भारतासह जगभरात यांच्या उपलब्धतेची माहिती कंपनीने दिलेली नाही. 

Web Title: Huawei nova 9 nova 9 pro launch with 120hz refress rate snapdragon 778g soc  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.