शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: April 03, 2018 6:00 PM

हुआवेकडून सर्वाधिक स्टोअरेजचा क्षमता असलेला स्मार्टफोन बाजारात

आपण आजवर २५६ जीबी स्टोअरेज असणार्‍या स्मार्टफोनबाबत ऐकले असेल. तथापि, हुआवे या कंपनीने तब्बल ५१२ जीबी स्टोअरेज असणारा स्मार्टफोन लाँच करून धमाल उडवून दिली आहे.

हुआवे ही चीनी कंपनी जगातील तिसर्‍या क्रमांकाची स्मार्टफोन उत्पादक असून आपल्या नाविन्यपूर्ण प्रॉडक्टसाठी ख्यात आहे. या कंपनीने आता सर्वाधिक स्टोअरेजचा स्मार्टफोन बाजारपेठेत आणून अन्य स्पर्धक कंपन्यांना सूचक इशारा दिला आहे. हुआवेने अलीकडेच पोर्शे डिझाईन मेट आरएस या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यासाठी हुआवेने पोर्शे डिझाईन या ख्यातनाम जर्मन ब्रँडसोबत करार केलेला आहे. या दोन्ही कंपन्यांच्या सहकार्याने हुआवे पोर्शे डिझाईन मेट आरएस हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. मात्र यातील सर्वात लक्षवेधी फिचर स्टोअरेजचे होय. याचे सर्वात हायर व्हेरियंट हे तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजची सुविधा असणारे आहे. खरं तर अलीकडच्या काळात १२८ आणि २५६ जीबी स्टोअरेज असणारे काही स्मार्टफोन्स बाजारपेठेत आहेत. तथापि, याच्या पलीकडे जात हुआवेने ५१२ जीबी स्टोअरेज दिले आहे. एका अर्थाने हा स्मार्टफोन एखाद्या संगणक वा लॅपटॉपप्रमाणेच स्टोअरेज असणारा ठरला आहे. यात किरीन ९७० हा गतीमान प्रोसेसर असून याची रॅम ६ जीबी इतकी आहे.

हुआवे पोर्शे डिझाईन मेट आरएस या स्मार्टफोनमधील अन्य अभिनव फिचर म्हणजे याच्या मागील बाजूस तीन कॅमेर्‍यांचा सेटअप आहे. यातील प्रमुख कॅमेरा हा ४० मेगापिक्सल्सचा आणि आरजीबी या प्रकारातील आहे. दुसरा कॅमेरा हा मोनोक्रोम प्रकारातील असून २० मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर तिसरा कॅमेरा हा लेईका टेलिफोटो लेन्सयुक्त आणि ३ एक्स झूमची सुविधा असणार्‍या प्रकारातील असून ८ मेगापिक्सल्सचा आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने यात अतिशय दर्जेदार छायाचित्रे काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २४.२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.

पोर्शे डिझाईन मेट आरएस मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी ( १४४० बाय २८८० पिक्सल्स) क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन वॉटर आणि डस्टप्रूफ आहे.  याच्या डिस्प्लेखालील फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. वायरलेस चार्जींगच्या सपोर्टसह यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारे असेल. हुआवे पोर्शे डिझाईन मेट आरएस या स्मार्टफोनचे ५१२ जीबी स्टोअरेच्या व्हेरियंटचे मूल्य २०९५ युरो म्हणजेच सुमारे १,६८,६०० रूपये इतके आहे. पहिल्यांदा हे मॉडेल युरोपात मिळणार असून लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :huaweiहुआवेMobileमोबाइल