चिनी स्मार्टफोन निर्माता हुआवेने त्यांचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात लॉन्च करून इतर कंपन्यांचे टेन्शन वाढवले आहे. हुआवेच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ५६०० एमएएच बॅटरी, किरिन ९०२० प्रोसेसरसारखे फीचर्स मिळतात. शिवाय, यात १६ जीबी रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हुआवेचा हा ट्रिपल फोल्डेबल फोन सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पो सारख्या ब्रँडसाठी एक मोठे आव्हान बनला आहे.
चीनी बाजारात लॉन्च झालेला हा फोन १६ जीबी रॅम + २५६ जीबी, १६ जीबी रॅम + ५१२ जीबी आणि १६ जीबी रॅम + १ टीबी तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनची सुरुवातीची किंमत १७,९९९ चिनी युआन (सुमारे २ लाख २२ हजार ३०० रुपये) आहे. तर, दोन व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे १९,९९९ चिनी युआन (सुमारे २ लाख ४७ हजार १०० रुपये) आणि २१,९९९ चिनी युआन (सुमारे २ लाख ७१ हजार ९०० रुपये) आहे. हा फोन काळ्या, जांभळ्या, लाल आणि पांढऱ्या रंगात लॉन्च करण्यात आला आहे.
हा ट्रिपल फोल्डेबल फोन १०.२ इंचांच्या मोठ्या स्क्रीनसह येतो. यात LTPO OLED फ्लेक्सिबल डिस्प्ले वापरला जातो, ज्याचे रिझोल्यूशन २२३२ x ३१८४ आहे. या फोनचा डिस्प्ले १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचा ड्युअल मोड डिस्प्ले ७.९ इंच आहे. त्याच वेळी त्याचा सिंगल मोड डिस्प्ले ६.४ इंच आहे. हा फोन ५६०० एमएएच बॅटरीसह येतो. तसेच हा फोन 66W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा मिळतो. याशिवाय, फोनमध्ये ४० मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड आणि १२ मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिस्कोप कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन HarmonyOS 5.1 वर काम करतो. यासह M-Pen 3 Stylus ला सपोर्ट करतो.