शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: June 29, 2022 10:01 AM

HTC Desire 22 Pro स्मार्टफोन Snapdragon प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह सादर करण्यात आला आहे.  

एकेकाळी लोकप्रिय असलेला स्मार्टफोन ब्रँड HTC पुनरागमन करत आहे. कंपनी आपली HTC VR प्रोडक्ट आणि Viverse ecosystem सेटअप करत आहे. आता या सिस्टममध्ये बसणारे स्मार्टफोन्स लाँच केले जातील. याची सुरुवात HTC Desire 22 Pro स्मार्टफोन पासून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये डिजिटल असेट्स जसे की, क्रिप्टोकरन्सी मॅनेज करण्यासाठी Viverse Wallet देखील देण्यात आलं आहे.  

HTC Desire 22 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

HTC Desire 22 Pro मध्ये 6.6 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनला Snapdragon 695 5G ची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे, सोबत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. वॉटर आणि डस्ट रजिस्टन्ससाठी फोनमध्ये IP67 रेटिंग देण्यात आली आहे.   

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 5MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. HTC Desire 22 Pro फोन Android 12 वर चालतो. यातील 4,520mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. 

HTC Desire 22 Pro ची किंमत 

सध्या हा होम मार्केट तैवानमध्ये सादर करण्यात आला आहे. तिथे याची किंमत 11,990 TWD (जवळपास 31,846 रुपये) आहे. हा फोन भारतात लाँच होईल की नाही याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.  

टॅग्स :HTCएचटीसीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान