शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

दुसऱ्यांची नजर पडताच स्क्रीन ब्लर; शानदार 4K डिस्प्लेसह HP चे दोन भन्नाट लॅपटॉप आले भारतात

By सिद्धेश जाधव | Updated: June 15, 2022 12:14 IST

एचपी ने भारतात दोन नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. ये लॅपटॉप 16 इंच आणि 13.5 इंच के डिस्प्ले साइज मध्ये आते आहेत. लॅपटॉप की आरंभिक किंमत 1.30 लाख रुपये आहे. इन लॅपटॉप मध्ये कंपनी 4K Oled डिस्प्ले देत आहे. 

HP नं भारतात आपल्या लॅपटॉप पोर्टफोलियोचा विस्तार करत Spectre x360 16 (2022) आणि x360 13.5 हे दोन प्रीमियम मॉडेल्स जोडले आहेत. या 2 इन 1 कन्वर्टिबल डिजाइनसह येणाऱ्या लॅपटॉप्समध्ये Intel Arc Graphics सह 12th Gen Intel Core प्रोसेसर देण्यात आले आहेत. तसेच 4K OLED  डिस्प्ले, 16 तासांचा बॅटरी बॅकअप आणि मॅग्नेटिक MPP 2.0 टिल्ट पेन असे फीचर्स देखील मिळतात.  

किंमत आणि उपलब्धता  

सीरिजमधील 16 इंचाच्या मॉडेलची किंमत 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 13.5 इंचाच्या व्हेरिएंटसाठी तुम्हाला 1,29,999 रुपये मोजावे लागतील. सध्या यांची प्री-बुकिंग कंपनीच्या वेबसाईटवरून सुरु करण्यात आली आहे. यांची खरेदी तुम्ही 18 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयसह करू शकता. हलक्या पितळी छटेसह नाइटफॉल ब्लॅक आणि सेलेस्टिअल ब्लू छटेसह नॉक्टर्न ब्लू अशा दोन आकर्षक रंगसंगतीमध्ये हे लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत.  

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन 

कंपनीच्या या दोन्ही लॅपटॉपमध्ये टचस्क्रीन असलेला 4K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. लॅपटॉपची खासियत म्हणजे यात पिंच-टू-झूम आणि डबल टॅपसह प्रेस एन्ड होल्ड टू ड्रॉ स्केच सारखे फिचर मिळतात. लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्ड आणि मोठ्या ट्रॅकपॅडसह टॉप बेजलमध्ये वेबकॅम मिळतो. यात 12th जेनरेशन इंटेल कोर i7 प्रोसेसर मिळतो.  

एआय पावर्ड असलेले हे लॉपटॉप एचपी ऑटो फ्रेम कॅमेऱ्यासह येतात जो तुम्ही कुठेही असलात तरी फोकसमध्ये ठेवतो. तुमच्या मागे कोणी आल्यास या लॅपटॉपची स्क्रीन ब्लर किंवा धूसर होते. तुम्ही लॅपटॉपपासून दूर गेल्यावर स्क्रीन लॉक होते आणि वेक ऑन अप्रोच यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. छोटे ब्रेक घेता यावेत यासाठी स्क्रीन डिस्टन्स रिमाइंडर आणि स्क्रीन टाइम रिमाइंडर यासाखी हेल्थ अँड बीइंग फीचर्स देखील आहेत.  

बॅटरी पाहता दोन्ही लॅपटॉपमध्ये खूप पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी सिंगल चार्जवर 16 तास वापरता येते. लॅपटॉपमधील बॅटरी फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते, जी 30 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज करते. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये एक HDMI पोर्ट, एक टाइप A पोर्ट, एक टाइप-C पोर्ट आणि मायक्रो एसडी कार्ड रीडर व्यतिरिक्त एक 3.5mm हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे.  

टॅग्स :laptopलॅपटॉप